रोहितशी वादासंदर्भात विराटने दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

रोहितशी वादासंदर्भात विराटने दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

मुंबई

: टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्य़ा प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. कर्णधारपदावरुन काढल्याबद्दल त्याने आश्चर्यकारक खुलाशा केला. तो म्हणाला, ‘सर्व काही आधीच निश्चित झाले होते आणि मला काही विचारले नाही. यामुळे निर्णयाचा स्वीकार करण्याशिवाय मला काहीच पर्याय नव्हता.विराट कोहली (Virat Kohli)दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट सीरिजनंतर (India vs South Africa Test Series) ब्रेक घेणार आहे.

रोहितशी वादासंदर्भात विराटने दिली सर्व प्रश्नांची उत्तरे
विराट-रोहितमधील वादामुळे सरकारही चिंतेत

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर उद्या भारतीय संघ रवाना होणार आहे. त्याआधी कोहलीने आज पत्रकार परिषद घेतली. कसोटी मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीबद्दल विराट म्हणाला की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आम्हाला रोहितच्या अनुभवाची कमतरता जाणवेल” ‘रोहितचा अनुभव आणि कौशल्याची उणीव भासेल’ असे विराट म्हणाला.

मी नेहमीच वन-डे सीरिजच्या निवडीसाठी उपलब्ध आहे. यापूर्वी देखील उपलब्ध होतो.' या शब्दात विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन-डे सीरिज खेळणार नसल्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

रोहितशी वादासंदर्भात विराटने दिली सर्व प्रश्नांची उत्तरे
Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळणार नाही, त्याने ब्रेक मागितला आहे, अशी कालपासून मीडियामध्ये चर्चा होती. “या चर्चेत अजिबात तथ्य नाही. मी वनडेसाठी उपलब्ध आहे आणि खेळण्यासाठी नेहमीच गंभीर होतो. जे खोट्या बातम्या लिहितात त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा” असे विराट म्हणाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com