Rakshabandhan : भाऊरायाकडून पैसे उकळण्यासाठी ताईने शोधली 'आयडियाची कल्पना'... VIDEO तुफान व्हायरल

Rakshabandhan : भाऊरायाकडून पैसे उकळण्यासाठी ताईने शोधली 'आयडियाची कल्पना'... VIDEO तुफान व्हायरल

दिल्ली | Delhi

राखीपौर्णिंमेचा दिवस भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. यादिवशी दोघेही एकमेकांवरील प्रेम, स्नेह साजरा करतात. त्यानंतर ती भावाकडून भेटवस्तू घेते. त्यामुळे बहिणी रक्षाबंधनाची उत्सुकतेने वाट बघत असते. जर भाऊराया भेटवस्तू आणायला विसरला तरी बहिणी कशी काय तिचं मान सोडणार. ती हक्काने त्याच्याकडून पैसे तरी घेते. सध्या सोशल मीडियावरही असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सध्याचं युग हे डिजिटलचं आहे. त्यामुळे अनेक आर्थिक व्यवहारापासून आजकाल गिफ्टदेखील ऑनलाइन दिले जातात. अशात एका बहिणीने भावाला रक्षाबंधनाला चुना लावण्यासाठी भन्नाट आणि हायटेक आयडिया शोधून काढली आहे. सण म्हटलं की स्त्रीयांना मेहंदी काढायला खूप आवडते. या बहिणीने तिच्या हातावर QR कोडची मेहंदी (QR Code Viral Rakhi) काढली आहे. सोशल मीडियावर या बहिणीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. बहिणीची ही मेंहदी पाहून भाऊरायादेखील चकरावतो.

या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, बहिण आपल्या भावाला मेहंदी दाखवते. मात्र भावाला हे खोटचं वाटतं. त्यामुळेच बहिण त्याला जर क्यूआर कोड स्कॅन झाला तर ५००० द्यावे लागतील.. अशी पैज लावते. आणि आश्चर्य म्हणजे हातावर काढलेला क्यूआर कोड चक्क स्कॅनही होतो. ज्यानंतर भाऊरायाला नाईलाजाने पैसे द्यावे लागतात.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com