Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याविनायक मेटेंच्या पत्नीकडून मृत्यूबाबत संशय; म्हणाल्या…

विनायक मेटेंच्या पत्नीकडून मृत्यूबाबत संशय; म्हणाल्या…

मुंबई | Mumbai

शिवसंग्राम संघटनेचे (Shiv Sangram) नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे काल पहाटे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर (Pune-Mumbai Express Highway) अपघाती निधन (Accidental death) झाले. त्यानंतर मेटे यांच्या अपघाती निधनावर त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी माध्यमांशी बोलतांना संशय व्यक्त केला आहे…

- Advertisement -

यावेळी ज्योती मेटे म्हणाल्या की, मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आले की काहीतरी वाईट घडले आहे. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार मृत्यूनंतर एवढ्या लगेच चेहरा पांढरा पडत नाही, काही काळानंतर चेहरा पांढरा पडायला सुरूवात होते, पण साहेबांचा चेहर अतोनात पांढरा पडला होता. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होते. रुग्णालयात (Hospital) गेल्याबरोबर मी त्यांच्या नाडीचे ठोके तपासले.

त्याठिकाणी डॉक्टरही होते, त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितले. पण मी विनायक मेटेंची बायको आणि डॉक्टर असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मला तिथे थांबण्याची परवानगी दिली. मी साहेबांच्या हाताची आणि मानेची नाडी तपासली, पण ती हाताला लागली नाही. ईसीजीमध्येही कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या, त्यानंतर मी माझ्या भावाला सांगितले की, हे थोड्या वेळापूर्वी घडलेले नाही.

मला फोन आल्यानंतर मी जवळपास पाऊण तासात याठिकाणी पोहोचले. पण ही पाऊण तासांपूर्वी घडलेली घटना नव्हती, ही घटना घडून किमान दोन तास उलटले होते, म्हणजे आमच्यापासून काहीतरी लपवले जात होते. कदाचित ते लपवतही नसतील, मीच भयाकुल असेल, नेमके काय असेल? हे मला माहीत नाही. पण मला फोन येण्याअगोदर अपघाताची घटना घडून खूप वेळ झाला होता. या सर्व बाबी आता शवविच्छेदन अहवालातून समोर येतील, मृत्यूची नेमकी वेळही समजेल असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या