बीड | Beed
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो लोकांनी साश्रुपूर्ण नयनांनी कै. मेटे यांना अखेरचा निरोप दिला.
विनायक मेटे यांचं रविवारी एका अपघातात निधन झालं होते. विनायक मेटें अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं आहे. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.