Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअन् विळवंडी शाळेच्या भिंतीही झाल्या बोलक्या..!

अन् विळवंडी शाळेच्या भिंतीही झाल्या बोलक्या..!

दिंडोरी । Dindori

लॉकडाऊन काळात विळवंडी ता. दिंडोरी येथील शिक्षकांनी गावातील भिंती बोलक्या केल्या आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

करोना महामारीमुळे जग वेगवेगळ्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे विविध लोकांचे रोजगार, कामधंदे, व्यवसाय अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. त्यापासून शिक्षणक्षेत्र सुद्धा वाचले नाही. करोनामुळे शाळा बंद झाल्या.

परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते की काय असे सर्वांना वाटू लागले. विळवंडी सारख्या दुर्गम भागात पालकांकडे स्मार्टफोन, टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप अशी साधने नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बर्‍याच अडचणी येऊ लागल्या. संपर्काची पुरेशी साधने नसल्याने शिक्षक गावात, घरी प्रत्यक्ष गेल्याशिवाय पर्यायच नव्हता.

अशा परिस्थितीमध्ये दररोज जाणे योग्यही नव्हते. अशावेळी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने शाळेतील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर कोकणे यांना एक कल्पना सुचली. गावातील मोकळ्या भिंतीवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे तक्ते, चित्रे रेखाटली तर तो अभ्यास विद्यार्थी गावांमध्ये येताना-जाताना रस्त्यावरून वाचन करतील, लेखन करतील, त्यावर चर्चा करतील.

मग ज्ञानेश्वर कोकणे यांनी ही कल्पना अमास सेवा ग्रुप मुंबईचे संचालक विजय भाई भगत, चंद्रकांत भाई देढिया यांना बोलून दाखवली त्यांना ती आवडली व त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता याकामी जेवढा खर्च होईल तो आम्ही करू असा शब्द दिला. आठ दिवसात गावातील सर्व दर्शनी भागातील भिंती विद्यार्थ्यांच्या अभ्यासाने रंगवून झाल्या.

आता गावातील सर्व विद्यार्थी भिंतीवरील अभ्यास पाहतात. हे सर्व अमास सेवा ग्रुपमुळे शक्य झाले. गावातील तीन ते चार गरजू कुटुंबांना दरमहा अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते.

भविष्यात सुद्धा असे अनेक समाजोयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प या ग्रुपचे संचालक विजय भाई भगत, चंद्रकांत भाई देढीया यांनी केला. गावातील भिंती अभ्यासाने बोलक्या करण्याच्या उपक्रमाचे कौतुक परिसरातील पालकांनी केले.

या उपक्रमासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, उमराळे बिटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण,केंद्रप्रमुख मिरा खोसे, मुख्याध्यापक महादू वाणी यांनी केले.

उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू वाघेरे, सुनील निकम, जयश्री मुरकुटे, अर्जुन जाधव, अश्विनी भामरे, चंद्रभागा कराटे, उज्वला बागुल, अरुण भारती, अनिल अहिरे, योगेश गाढवे, दिलीप शिंदे, गिरीश बोरसे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या