Friday, April 26, 2024
HomeजळगावPhotos #ग्रामस्थांनी पेटविले अवैध वाळूचे ट्रॅक्टर

Photos #ग्रामस्थांनी पेटविले अवैध वाळूचे ट्रॅक्टर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गिरणा नदीपात्रातून (Girna river basin) अवैधवाळूचा उपसा(Extraction of illegal sand) करणार्‍या ट्रॅक्टरने (tractor) प्रवासी रिक्षाला (rickshaw) उडविले. या अपघातात (accident) रिक्षातील प्रवासी (Passengers) गंभीर जखमी (seriously injured) झाल्याने संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी (villagers) वाळूचे दोन ट्रॅक्टर (Two sand tractors) पेटवून (burning) दिले. ही घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी या आधीही अवैध वाळू उपसाला विरोध केला होता, मात्र महसूल व पोलीस प्रशासनाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आज संतप्त गावकर्‍यांनी ट्रॅक्टर पेटवित प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणजळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

गिरणा नदीपात्रा लागत असलेल्या आव्हाणे, कानळदा, खेडी यासह अनेक गावातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आव्हाणे गावातील मरीमाता मंदिराकडून येत भरधाव वेगाने येणार्‍या वाळूच्या ट्रॅक्टरने जळगावकडून येणार्‍या (एम.एच.19,1413) क्रमांकाच्या प्रवासी रिक्षाला बस स्टॅण्डजवळ उडविले.

या अपघातात रिक्षा चालकासह प्रवासी जखमी झाल्याने ट्रॅक्टर चालकाने त्याठिणी ट्रॅक्टर सोडून पळून गेला. दरम्यान, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रिक्षाला उडविणार्‍या ट्रॅक्टरला आग लावली. याचवेळी मागून आणखी एक वाळूचे ट्रॅक्टर येत असल्याने ग्रामस्थांनी ते ट्रॅक्टर देखील पेटवून दिल्याने गावात एकच खळबळ माजून गेल होती.

VISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदाVISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल

नदीपात्रातून भरदिवसा केला जातो उपसा

शासनाने वाळूचे धोरण निश्चित केले असताना, तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून भर दिवसा वाळू उपसा करून सर्रासपणे वाळूची वाहतूक होतेच कशी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अवैध वाळू उपसा विरोधात अनेकदा गावकर्‍यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. मात्र प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांनी आज आक्रमक भूमिका घेवून थेट वाळूचे ट्रॅक्टरच पेटवून दिले.

पेटविलेले दोघ ट्रॅक्टर विनाक्रमांकाचे

ग्रामस्थांनी पेटविलेले अवैध वाळू वाहतुक करणारे दोन्ही ट्रॅक्टर विनाक्रमांकाचे होते. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर ट्रॉली पासून वेगळे करुन पोलीस ठाण्यात जप्त केले. दोघ ट्रॅक्टर विनाक्रमांकाचे असल्याने ते नेमके कुणाचे होते ते समजू शकले नसून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…

अवैध वाळू उपसाला यंत्रणेचे पाठबळ

पोलिसांसह महसुल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गिरणा नदीपात्रातून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जातो. मात्र त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्याने अवैध वाळू उपसा करणार्‍यांना यंत्रणेचेच पाठबळ असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांकडून केला जात होता.

यंत्रणा उशिराने घटनास्थळी दाखल

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ट्रॅक्टर पेटविल्याची घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. मात्र सुमारे साडेचार वाजेपर्यंत तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी व महसूल प्रशासनाचा एकही अधिकार्‍याने घटनास्थळी दाखल झाले नव्हते. पाच वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे पोलीसांचा फौजफाटा घेवून घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांची गर्दी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या