नाशकात वन कर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांचा हल्ला; एकाचे अपहरण, 'इतक्या' तासांनी झाली सुटका

नाशकात वन कर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांचा हल्ला; एकाचे अपहरण, 'इतक्या' तासांनी झाली सुटका

ठाणापाडा | Thanapada

नाशिक जिल्ह्यातील (nashik district) सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) लाकडाच्या तस्करीबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. (attack on forest employees in surgana taluka) याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत...

अधिक माहिती अशी की, सुरगाणा (Surgana) तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील (Umbarthan Forest range) उंबरपाडा (चाफावाडी) फणसाचे माळ शिवारात रात्रीच्या वेळी साडेसातच्या सुमारास खैराच्या लाकडाची तस्करी होणार असल्याची गुप्त वार्ता वनविभागाला मिळाली होती.

या गुप्त बातमीच्या आधारे वन कर्मचारी यांनी सापळा (Trap) रचला होता. यामध्ये फिर्यादी रामजी कुवर वनरक्षक यांनी म्हटले आहे की, ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. १५,पी.एस.७२८६ यामध्ये खैराचे लाकूड भरून लालजी टोपले हा घेऊन चालला होता.

त्यास विचारुन अटकाव केला असता त्यांनी ग्रामस्थांना बोलावून कामात अडथळा निर्माण केला. यामध्ये कमलाकर चव्हाण, सावळाराम गावित, ज्ञानेश्वर गावित यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करुन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली.

यामध्ये कुवर यांची दुचाकी क्रमांक एम. एच. १५,एफ.जे.२८१६ हि दंडुक्याने ठेचून नुकसान केले. तसेच घोळका करून हल्ला केल्याचे म्हटले आहे. तसेच ज्ञानेश्वर गावित याने पोटावर, हातापायांवर दगडाने मारुन गंभीर जखमी केले.

कुवर यास काहीजण पकडून गावात घेऊन गेले. तेथे मला बांधून ठेवून एक ते दीड तास ओलीस ठेवत जबर मारहाण केली.

परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असली तरीदेखील खैर लाकडाच्या तस्करीचे धागेदोरे सोनगीर ते गुजरात राज्यातील तस्कराशी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. हा तस्कर नेमका कोण आहे हे शोधून काढणे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

स्वत: कुवर व त्यांचे सहकारी वनरक्षक हिरामण थविल, जंजिराम चौरे, व अक्षय पाडवी सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास चाफावाडी जवळील उंबरपाडा शिवारात गस्त घालत असताना लालजी टोपले यांच्या ट्रॅक्टरमध्ये खैराची लाकडे दिसून आली.होती.

तर लालजी टोपले (४०) यांनी देखील वन कर्मचारी यांचे बाबत फिर्याद दिली असून त्यांनी फिर्यादित म्हटले आहे की, मी सोमवारी दुपारी दीड वाजता स्वमालकीचे ट्रॅक्टर घेऊन गवत आणण्यासाठी डोंगराला गेलो होतो. तेथे ट्रॅक्टर उभा करून मी परत घरी आलो.

त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता डोंगराला उभा करून ठेवलेला ट्रॅक्टर घ्यायला गेलो. मात्र, उशीर झाल्याने गवत न भरताच रिकामा टॅक्टर घेऊन परत येत असताना या चारही वनकर्मचरींनी मला थांबवले व मला सांगितले की, डोंगरावर लाकडे गोळा करून ठेवली आहेत.

ती तू ट्रॅक्टर रिकामाच घेऊन जात आहेस तर ती लाकडे भरून उंबरठाण येथे सोडून दे असे सांगितले. मात्र, मी लाकडे वाहून नेण्यास नकार दिला. नकार दिल्याचा राग येऊन या वनकर्मचाऱ्यांनी काठी व लाथा बुक्यांनी मारहाण केली अशी फिर्याद दिली आहे.

दोन्ही बाजूंनी परस्परविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे, सहारे, एस. आय. बर्डे, इ. जी. भालेराव, ढुमसे हे सुरगाणा पोलिस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Related Stories

No stories found.