फडणवीस म्हणाले होते, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणे हे चूकच

jalgaon-digital
2 Min Read

शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale)यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणे हे चूकच झाल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला.

सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राह्मण महासंघाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले यांनी विविध घडामोडींवर आपली परखड मतं मांडली.

शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी दिलं असतं तर काय बिघडलं असतं? असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यावेळी फडणवीसांनी झाली चूक असं म्हटलं होतं, असा दावा गोखले यांनी केला. ते म्हणाले, “फडणवीसांनी तेव्हा झाली चूक असं मला म्हटलं होतं. पण खरंतर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना तुम्ही फसवू शकत नाही. कारण मग लोक कधीतरी त्याची प्रचंड शिक्षा तुम्हाला करतात. ती आता आपण भोगत आहोत. मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि म्हणूनच मी कोणत्याही राजकीय पक्षाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश वगैरे झुगारुन देतो’, असं गोखले म्हणाले.

भाजपा-शिवसेनेनं एकत्र यायला हवं

“शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कारणासाठी केली, ज्यांच्यामुळे मराठी माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरू आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे”, असंही विक्रम गोखले म्हणाले आहेत.

माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

देश कधीही हिरवा होणार नाही

लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही २ ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे, असंही विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *