मल्ल्या, मोदी आणि चोक्सीची 9371 कोटींची संपत्ती बँकांच्या ताब्यात

मल्ल्या, मोदी, चोक्सी
मल्ल्या, मोदी, चोक्सी

नवी दिल्ली

भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी (Vijay Mallya, Nirav Modi and Mehul Choksi) यांना मोठा दणका बसला आहे. या तिघांची मिळून 9371कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने तिघांची 18 हजार 170 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी 9 हजार 371 कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे. ईडीने ट्वीट करून या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे.

मल्ल्या, मोदी, चोक्सी
चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच लांबवले

अंमलबजावणी संचालनालयने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची 18 हजार 170 कोटींची संपत्ती संपत्ती निवारण अधिनियम 2002 अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत 18 हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीपैकी 9 हजार 371.17 कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ‘ईडी’कडून या तिघांच्याही देश-विदेशातील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेपैकी 969 कोटींची मालमत्ता ही परदेशात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com