Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशविजय मल्ल्यास बुरे दिन : वकिलाची फी भरण्यास नाहीत पैसे

विजय मल्ल्यास बुरे दिन : वकिलाची फी भरण्यास नाहीत पैसे

लंडन

भारतातील सरकारी बँकांची हजारो कोटींत फसवणूक करुन लंडनमध्ये फरार झालेल्या विजय मल्ल्यास ‘बुरे दिन’ आले आहेत. त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. वकीलाचे फी भरण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नाहीत.

- Advertisement -

भारताच्या तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या विजय मल्ल्याने लंडन उच्च न्यायालयाला विनंती केली आहे. फ्रान्सची मालमत्ता विकून जे पैसे मिळाले आहेत. त्यातील १४ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भारतात ऐषो-आरामी जीवन जगणाऱ्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये आता पै-पैचा हिशोब ठेवावा लागत आहे. वकिलाची फी देण्यासाठीही विजय मल्ल्याकडे आता पैसे नाहीत. त्यामुळे वकीलानेही पैसे लवकर मिळाले नाहीत तर खटला लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या विजय मल्ल्याची संपत्ती लंडन न्यायालयाच्या निगराणीखाली आहे. मल्ल्या ही संपत्ती विकू शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यावर कर्जही घेऊ शकत नाही.

दरम्यान, विजय मल्ल्याची अवस्था पाहून न्यायालयाने त्याला थोडासा दिलासा दिला आहे. खटल्याची फी भरण्यासाठी 39 लाख रुपये मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. परंतु, वैयक्तिक खर्चासाठी एक पैसाही देणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

विजय मल्ल्याविरोधात केवळ लंडनमध्येच नव्हे तर भारतातही अनेक ठिकाणी खटले सुरु आहेत. यासाठी विजय मल्ल्याला मोठी रक्कम खर्च करावा लागत आहे. 64 वर्षीय मल्ल्याने भारतातील सरकारी बँकांची कोट्यवधींची फसवणूक करुन लंडनमध्ये फरार झाला आहे. त्याच्या पर्त्यापणासाठी भारत सरकार दीर्घकाळापासून कायदेशीर लढाई लढत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या