विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अ‍ॅक्शन मोडवर; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी समोर आली 'ही' महत्वाची माहिती

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अ‍ॅक्शन मोडवर; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी समोर आली 'ही' महत्वाची माहिती

मुंबई | Mumbai

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आमदार अपात्रता प्रकरणातील (MLA Disqualification Case) याचिकांच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत शेवटची मुदत दिली आहे. विधानसभा अध्यक्ष ३० ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक जाहीर करु शकले नाहीत तर न्यायालयाला (Court) वेळापत्रक ठरवावे लागेल, असा इशारा कोर्टाने दिला आहे...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अ‍ॅक्शन मोडवर; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी समोर आली 'ही' महत्वाची माहिती
मुंबईतील कांदिवलीत इमारतीला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, तिघे जखमी

तसेच विधानसभा अध्यक्षांना ही शेवटची संधी असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA Disqualification) सुनावणीचे नवे वेळापत्रक तयार करण्यासाठी कामाला लागल्याची माहिती समोर आली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली आहे.

यानंतर आता शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचे नवं वेळापत्रक दसऱ्यानंतर तयार होणार असल्याचे बोलले जात असून याबाबत महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर चर्चा करणार असल्याचे समजते. याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दसऱ्यानंतर दिल्ली दौऱ्यावर (Visit to Delhi) जाणार असून त्यावेळी नवे वेळापत्रक तयार करण्यासंदर्भात कायदातज्ज्ञांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अ‍ॅक्शन मोडवर; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी समोर आली 'ही' महत्वाची माहिती
Devendra Fadnavis : "मराठा समाजाला आरक्षण..."; देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

दरम्यान, आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरची पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांना ६ याचिकांमध्ये एकत्र करण्याचा निर्णय घेतला. तर शिंदे गटाला कागदपत्रे जमा करण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंतची वेळ वाढवून दिली. तर ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जमा केलेली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे २६ ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अ‍ॅक्शन मोडवर; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी समोर आली 'ही' महत्वाची माहिती
नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर आता 'या' जिल्ह्यात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com