Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशElection Results तामिळनाडूमध्ये द्रमुक, पुद्दुचेरीमध्ये एनडीएची सत्ता

Election Results तामिळनाडूमध्ये द्रमुक, पुद्दुचेरीमध्ये एनडीएची सत्ता

नवी दिल्ली

पाचही राज्यांच्या मतमोजणी सुरु होऊन सहा तासांचा वेळ झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, केरळमध्ये डाव्या पक्षांची एलडीएफ, आसाममध्ये भाजप, पुद्दुचेरीत एनडीए आणि तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीवर आहे.

- Advertisement -

पुद्दुचेरीमध्ये 30 जागांपैकी 4 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये डीएमके 1, बीजेपी 1 आणि एन.आर.काँग्रेसनं 2 जागांवर विजय मिळवला आहे.

West Bengal Election Result : ममतांची डब्बल सेंच्चुरी, भाजप शंभरपासून दूर

मतमोजणीच्या सध्या आकडेवारीनुसार द्रमुक आणि मित्रपक्षांची आघाडी 140, अण्णाद्रमुक आणि मित्रपक्षांची आघाडी 90, इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल 10 वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे. द्रमुककडून एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री होऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांचे अभिनंदन केलं आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय त्यांची सेवा करण्यासाठी शुभेच्छा, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या