Video : पोलीस म्हणतात, सातपूरमधील खून युनियनच्या वादातून

Video : पोलीस म्हणतात, सातपूरमधील खून युनियनच्या वादातून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात (nashik) गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. हत्येच्या (Murder) घटनेनं नाशिक शहर पुन्हा हादरलं आहे. सातपूर परिसरातील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे (Amol Ighe) यांची निर्घृण हत्या झाली. त्यासंदर्भात पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली. हा खून कामगार संघटनांमधील आपसातील वादातून झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिली....

माध्यामांशी बोलतांना पोलीस उपायुक्त विजय खरात म्हणाले की, सकाळी ७.३० ते ७.४५ दरम्यान इंडियन रायटींग कंपनीच्या चौकात अमोल इघे यांची हत्या झाली. इंडियन रायटींग कंपनीत अमोल इघे यांची कामगार संघटना आहे. या कंपनीत काम करणारा विनायक बाळासाहेब बर्वे याला बरखास्त केले होते. त्यानेच इघे यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.

अटकेसाठी पथके रवाना

कामगार युनियनच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपी व मयत इसम दोघे एकमेकांना परिचित होते. आरोपी विनायक यांच्यावर यापुर्वी दोन गुन्हे दाखल झाले होते. आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना झाली आहे. यासंदर्भात पुर्ण माहिती तपासात निष्पण होतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com