Video : गोदातीरी भाविकांची तुफान गर्दी; मनपा व पोलीस आयुक्तांचे केविलवाणे आवाहन

Video : गोदातीरी भाविकांची तुफान गर्दी; मनपा व पोलीस आयुक्तांचे केविलवाणे आवाहन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) आणि पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी गोदाघाटावरील म्हसोबा पटांगण परिसरात पाहणी दौरा केला. शहरात जमावबंदी लागू असताना भाविकांनी गोदाघाटावर गर्दी केलेली यावेळी दिसून आली...

याबाबत बोलताना पोलीस आयुक्त पांडेय आणि मनपा आयुक्त जाधव यांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. तसेच करोना (Corona) नियंत्रणासाठी शासनाची त्रिसूत्री पाळण्याचे केविलवाणे आवाहन केले.

गणेशोत्सव काळात (Ganeshotsav 2021) गणेश मंडळांना मार्गदर्शक तत्वे लावून दिली होती. शहरातील गणेश मंडळांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, गणेश मूर्ती महापालिका केंद्रांवर संकलित करण्याव्यतिरिक्त घरगुती गणपती बसविणाऱ्या भक्तांना कोणतेही मार्गदर्शक तत्वे आखून दिलेले नव्हते. याचाच परिणाम विसर्जनाच्या दिवशी भाविकांनी केलेल्या गर्दीत दिसून आला.

पोलीस आयुक्तालयामार्फत देखील जवळपास अडीच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपारपर्यंत सुरळीत असलेली गर्दी दुपारनंतर गोदाघाटावर अचानक वाढत गेली. त्यातच पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांनी पाहणी दौरा घोषित करत महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी म्हसोबा पटांगणात दिमतीला पोहचले.

घरगुती गणपती विसर्जनासाठी नाशिकच्या गोदातीरी गणेश भक्तांची तुफान गर्दी केली आहे. शहरात पोलीस आयुक्तालयातर्फे जमावबंदी आदेश जारी केला असला तरी गोदाघाट परिसरात भाविकांची गर्दी दिसून येत आहे.

दरम्यान, दिवसभर महापालिकेतर्फे ठिकठिकाणी टॅंक तसेच मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी करोनाचे नियम विसरून आपल्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गोदातीरावर गर्दी केली होती.

प्रशासनाकडून गणेश भक्तांना गर्दी न करण्याचे तसेच जमावबंदी आदेशाचेदेखील पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.

मनपा आयुक्तांचे फोटोसेशन
मनपा आयुक्तांचे फोटोसेशन
पोलीस आयुक्तांचा सेल्फी
पोलीस आयुक्तांचा सेल्फी

पोलीस आयुक्तांचा सेल्फी; तर मनपा आयुक्तांचे फोटोसेशन

दरम्यान, पाहणी दौऱ्यात गर्दी करून असलेल्या भाविकांनी पोलीस आयुक्तांसोबत फोटो घेण्याला प्राधान्य दिले. पोलीस आयुक्तांनी देखील यास सकारात्मकता दर्शवत सेल्फी काढला तर भाविकांनी आणलेला प्रसाद घेत फोटो घेण्याचा मोह मनपा आयुक्तांना आवरला गेला नाही. त्यामुळे परिसरात हे दोन्ही विषय चर्चेचे ठरले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com