Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशचाकूने दहशत माजवणाऱ्यावर पोलिसांची ओपन फायरिंग, थरारक VIDEO कॅमेऱ्यात कैद

चाकूने दहशत माजवणाऱ्यावर पोलिसांची ओपन फायरिंग, थरारक VIDEO कॅमेऱ्यात कैद

कलबुर्गी | Kalaburagi

हातात चाकू घेऊन दहशत माजवणाऱ्या एका माथेफिरुला कर्नाटक पोलिसांनी (Kalaburagi Police) चांगली अद्दल घडवली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी या माथेफिरुला लोकांना न धमकविण्याची आणि हातातील चाकू टाकून देण्याची वारंवार विनंती केली. परंतू, हा माथेफिरु ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता.

उलट त्याचा उद्दामपणा अधिकच वाढत होता. परिणामी पोलिसांनी संभाव्य धोका विचारात घेऊन आणि माथेफिरुला नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार केला. त्याच्या पाया गोळी मारुन त्याला जायबंदी केले आणि पकडले.

फजल भगवान असं त्याचं नाव आहे. ही घटना कलबुर्गी येथे रविवारी सायंकाळी घडली. केवळ लोकांवरच नाही तर फजल भगवान याने पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. जखमी फजलला प्रथम रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या