'एनडीं'मुळेच नाशिक झाले सुपीक; आता राहिल्या फक्त आठवणी

दिवंगत एनडी पाटील यांचे नाशिक कनेक्शन
'एनडीं'मुळेच नाशिक झाले सुपीक; आता राहिल्या फक्त आठवणी

नाशिक | नरेंद्र जोशी Nashik

डाव्या, पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक ज्येष्ट नेते प्रा. एन.डी पाटील यांंचे आज निधन झाले. (N D Patil Passes Away) जसे आज नाशिक अनेकांना भावते ती परंपरा अगदी पूर्वीपासून आहे. दिवंगत एन डी नियमित नाशिकला येत असत. त्याच्याकडे तेव्हा तरुणाई आकर्षिली जात होती....(N D Patil Nashik Connection)

ते नियमित या तरुणांना भ्रष्टाचारापासुन दुर राहण्याचा सल्ला देत असत. (away from corruption) नैतिकता टिकवुन ठेवण्याचा व स्व असो अथवा नसो मात्र जनतेत काम करत राहण्याचाच सल्ला द्यायचे. आज त्यांच्या निधनाचे वृत्त येताच त्यांच्या मुशीत घडलेल्या कार्यकर्त्यांना दु:ख अनावर झाले.

प्रा. एन.डी पाटील (ND Patil) यांचा नाशिकशी ऋणानुबंध 1970 पासुन होता. अ‍ॅड़ नारायणराव बस्ते, माजी खा. विठ्ठलराव हांडे, एकनाथभाऊ जाधव, केरु पााटील हगवणे, कोतवाल मामा, डॉ.डी.एल.कराड, जे.टी.शिंदे, मनीष बस्ते, निवृत्ती गायधनी, पी बी गायधनी, यांच्या माध्यमातुन त्यंना नाशिकमद्ये डाव्या चलवळीचे मोठे काम केले.

शेतकरी कामगार पक्षाचे आडगावला दोन दिवसीय अधिवेशन झाले होते. (Shetkari Kamgar Paksha two days summit at adgaon) तेव्हा ते आडगावच्या शिंदे मळ्यात राहीले होते. येथील शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी सातत्यानेे लढे दिले.

आळंदी धरणातून जाणारा जो डावा तट कालवा (left canal from alandi dam nashik) आज दिसतो आहे व ज्यामुळे तालुक्यातील शेती बहरली तो डावा कालवा होण्यासाठी त्यांचे आंदोलन कारणीभूत होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंंत्री वसंंतराव नाईक (ex chief minister vasantrao naik) यांचा ताफा आपल्या बैलागाडी मोर्चाने अडविला होता. (Bullock cart agitation)

याच डावा तट कालव्याची मागणी केली होती. त्यानंतर आज कालवा वाहुन अनेकांची शेती बहरलेली दिसत आहे.

त्यात एन.डी पाटलांंची दुरदृष्टी कारणीभुत आहे. त्यानंतर ते सातत्याने पुरागामी युवक संघटनेच्या माध्यमातुन नवतरुणांंना मार्गदर्शन करुन कोणत्याही परिस्थितीत नैतिकता टिकली पाहीजे. ,

भ्रष्टाचार व व्यसनापासुन दुर राहण्याचा सल्ला देत होते. राजकारण आज जे काही चांगले दिसत आहे. हे त्यांच्या शिकवणीमुळेेच आहे.

अलीकडील काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 1989 साली झाली. तेव्हापासून प्रा. एन .डी.पाटील हे समितीचे अध्यक्ष राहिलेले.

ते समितीचे जेष्ठ मार्गदर्शक होते. जादुटोणा विरोधी कायद्याच्या निर्मितीत त्यांनी महत्वाची भुमिका बजावली होती.

Related Stories

No stories found.