उद्धव ठाकरे-दीपक केसरकरांमध्ये शाब्दिक बाचाबाची

उद्धव ठाकरे-दीपक केसरकरांमध्ये शाब्दिक बाचाबाची

नागपूर | Nagpur

हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session) निमित्ताने विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आज अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या कार्यालयात सामोरासमोर आल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे समजते.

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) उपसभापतींच्या दालनातून बाहेर चालले असतांना त्याचवेळी उद्धव ठाकरे आतमध्ये प्रवेश करत होते. यादरम्यान दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाला. यावेळी उद्धव ठाकरे केसरकरांना म्हणाले की, तुम्ही शाखा कार्यालय ताब्यात घेताय हे काही बरोबर नाही. तुम्ही जे करताय ते बरोबर नाही. सत्ता मिळाली तर घ्या आणि व्यवस्थित राहा, असे म्हटले. त्यावर केसरकर काहीही न बोलता कार्यालयातून निघून गेले, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काल शिंदे गटाने (Shinde group) मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले होते. त्यावरून काल ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत गोंधळ घातला होता. यानंतर आज ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation)आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन (Agitation) केले होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com