जीपीओ रस्त्यावर वाहनांचा गराडा; अरूंद रस्ते त्यात वाहने रस्त्यांवरच पार्किंग

जीपीओ रस्त्यावर वाहनांचा गराडा; अरूंद रस्ते त्यात वाहने रस्त्यांवरच पार्किंग

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

ग्रामीण भागाची (rural area) खर्‍या अर्थाने नाळ जोडलेले मिनी मंत्रालय (Mini Ministry) अर्थातच जिल्हा परिषद मुख्यालय (Zilha Parishad Headquarter) आणि परिसर हा दुचाकी व चार चाकी वाहनांच्या भाऊगर्दीने नेहमीच वेढलेला राहत आहे.

या भागात शासकीय कामानिमित्त अन् तेही चार चाकी वाहनाने जायचे म्हटले की, नको रे बाबा अशीच प्रतिक्रिया ग्रामीण भागातून येणार्‍या अनेकांची असते. येथील पार्किंगच्या (parking) असुविधेमुळे ग्रामीण भागातून येथे यायचे म्हटले तर एक तर बसने, दुचाकीने नाही तर चार चौघे मिळून चार चाकीने यायलाच प्राधान्य दिले जात आहे. असे दैनंदिन चित्र आहे.

त्र्यंबक नाका सिग्नल (Trimbak naka signal) ते जिल्हा पोस्ट ऑफिस (District Post Office) आणि अण्णाभाऊ साठे पुतळा ते कालिदास कलामंदिर (Kalidas Kalamandir) या रस्त्याला वाहनांनी गराडा घातल्याचे चित्र दररोज बघावयास मिळते. हा रस्ता म्हणजे सार्वजनिक सुविधा पुरविणार्‍या कार्यालयांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून ठक्कर बाजार, जिल्हा रुग्णालय, जिल्हा पोस्ट ऑफिस, महावितरण कार्यालय, विविध सहकारी, राष्ट्रीयकृत बँका, शाळा, हॉस्पिटल ब्लड बँक अशा महत्त्वाच्या संस्थांना जोडण्यासाठी हा रस्ता म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.

या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी (traffic jam) आणि वाहनांची वर्दळ कमी व्हावी, याकरिता या रस्त्यावर त्रंबक नाका सिग्नल आणि अण्णाभाऊ साठे पुतळा अशा दोन ठिकाणी वाहतूक पोलिसाची (Traffic Police) नेमणूक करणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक कमी करण्याकरिता येथे उड्डाणपुलाची (flyover) नितांत गरज आहे, तशी मागणी विशेषत ग्रामीण भागातून येणार्‍या ग्रामस्थांकडून होत आहे.

या मार्गावर क्सिस बँक, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था, अभियंता पतसंस्था, फेडरल बँक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, बँक ऑफ पटियाला, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी बँक अशा सहकारी, निम सरकारी व राष्ट्रीयकृत बँका असल्याने खातेदारांची मोठी वर्दळ असते.

डोळ्यांचे बिर्ला आय हॉस्पिटल, चिरंजीवी हॉस्पिटल, ब्लड बँक, वाईन शॉप, तीन पेट्रोल पंप, जिल्हा परिषद मुख्यालया मागे असलेले स्त्री रोग तज्ञ हॉस्पिटल, महावितरण कार्यालय, सोसायट्यांची नोंदणी कार्यालय (फेडरेशन), जवळच असलेला सेंट्रल मॉल, जिल्हा रुग्णालय, ठक्कर बाजार अशा महत्वाच्या केंद्राना जोडणारा हा रस्ता.

जिल्हा परिषद आवारात पार्किंगची व्यवस्था (Parking arrangement) नसल्याने जिल्हा परिषद (zilha parishad) गेटच्या दुतर्फा नियमित होणारी चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्किंगचा फटका वाहतूक कोंडीवर होतो. जवळच असलेल्या कालिदास कलामंदिरा (Kalidas Kalamandir) समोरील मनपाच्या वाहनतळावर चार चाकी वाहनांसाठी पार्किंगचा वापर वाहनधारकांनी केल्यास या रस्त्यावरील वाहतुकीवरील कोंडी कमी होण्यास निश्चित मदत होईल.

जिल्हा परिषद मुख्यालयात दिव्यांग कार्यालय असल्यामुळे येथे येणार्‍या दिव्यांग बांधवांना सर्टिफिकेट घेण्यासाठी आल्यानंतर आपले वाहन लावने जिकरीचे होते. सायंकाळी व सकाळी कार्यालयीन वेळ सुरू व सुटण्याच्या वेळेत या रस्त्यावर अपघातांना आमंत्रण मिळते. त्यातही कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतर महिला सेविकांना आपल्या दुचाकीवरून जाताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.

या भागात रस्त्यावर सिगारेटचा झुरका घेत चहा प्रेमींचीही संख्या मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे येथे त्यांचा अन त्यांच्या दुचाकींची अस्तव्यस्त पार्किंग नित्याची झाली आहे. जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासनाने माजी सदस्यांच्या वाहनांनाही मुख्यालयात ‘नो एन्ट्री’ केलेली आहे. यामुळे माजी सदस्यांनाही मुख्यालयाबाहेर वाहने लावावी लागत असल्याने पार्किंगची अडचण निर्माण होत आर्हे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com