Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहापौरांसह पदाधिकार्‍यांची वाहने, दालने प्रशासनाच्या ताब्यात

महापौरांसह पदाधिकार्‍यांची वाहने, दालने प्रशासनाच्या ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) इतिहासात प्रथमच प्रशासकराज (Administrator Rule) आले आहे. पालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी कालपासून प्रशासक म्हणून कामकाज सुरू केले… मात्र काल पहिल्याच दिवशी आयुक्त जाधव मुंबईला होते…

- Advertisement -

विद्यमान महापौर तसेच सर्व नगरसेवक यांची मुदत 13 मार्च रोजी संपल्याने महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामायण बंगला (Ramayana Bungalow) यासह महापौर, उपमहापौर यांचे कार्यालय, स्थायी समितीचे कार्यालय, विविध गट नेते यांचे कार्यालय तसेच प्रभाग सभापतींच्या गाडया आज महापालिका प्रशासनाने (NMC Administration) ताब्यात घेेतल्या. नगरसचिव राजू कुटे (Raju Kute) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सकाळपासून सुरु होती.

करोना (Corona) व ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) नाशिक महानगरपालिकेची निवडणूक (Nashik NMC Election) लांबणीवर पडली. परिणामी पालिकेवर प्रशासकाची नेमणूक शासनाला (Government) करावी लागली. सोमवारी सकाळपासूनच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांकडे असलेली दालने व वाहने आपल्याकडे घेण्याकरिता प्रशासनाची लगबग सुरु होती.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते यांच्यासह नाशिकच्या सहापैकी चार प्रभात सभापतींच्या गाड्या महापालिका प्रशासनाने ताब्यात घेऊन पार्किंगमध्ये लावल्या. नाशिक पूर्व विभाग तसेच पश्चिम विभागातील सभापतींनी शासकीय वाहन घेतलेले नव्हते, त्यामुळे त्यांना महापालिकेच्यावतीने नियमाप्रमाणे भत्ता मिळायचा.

रामायणमधून साहित्य रवाना

आज सकाळी महापौरांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यातून महापालिकेच्या सेवकांनी विविध प्रकारचे साहित्य रिक्षात टाकून नेले. मागील दोन आठवड्यांपासून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने विविध प्रकारचे भूमिपूजन कार्यक्रम सुरू होते.

Video Story : नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट म्हणजे नेमकं काय?; जाणून घ्या सविस्तर

यामुळे नारळांसह विविध साहित्य याठिकाणी आणण्यात आले होते, तर आज ते देखील इतर ठिकाणी हलविण्यात आले. दरम्यान, महानगरपालिकेची निवडणूक (NMC Election) कधी होणार? याबाबत अद्याप स्पष्ट चित्र झालेले नसल्यामुळे नवीन महापौर व इतर पदाधिकारी कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसुब्यांवर प्रशासकीय राजवटीचे विरजण

उत्तर प्रदेशासह (Uttar Pradesh) चार राज्यात मिळालेले घवघवीत यश, शहरात विकासकामांचा पिटलेला डिंंगोरा यामुळे आगामी महापालिका निवडणुुकीतही विजयाची परंपरा कायम ठेवण्याचे भारतीय जनता पक्ष (BJP) कार्यकर्त्यांच्या मनसुब्यांंवंर प्रशासकीय राजवटीने विरजण पाडले आहे. निवडणुका (Election) वेळेत झाल्या असत्या तर कदाचीत तापलेल्या तव्यावर व विजयाची पोेळी भाजून घेणे सोयीचे झाले असते.

गेल्या पंचवार्षीक प्रमाणेेच यंदाही भारतीय जनता पक्षाने (BJP) महापालिकेवर विजयाचा झेंंडा फ़डकविण्यासाठी कंबंर कसली होती. एकेका वा़ॅर्डातील चार-पाच जणांंनी अर्ज नेऊन निवडणुकीत रंंग भरला होता.

आपली मुदतं संंपण्यापूर्वी आपण केलेल्या विकास कांमांंच्या भूमिपुजनाचा धडाकाही पक्षाने लावला होता. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांंना पाचारण केलेे. त्यासाठी नारायण राणे, रावसाहेब दानवे ,भारती पवार, कपील पाटील ही मंडळी नाशिकला येऊन गेली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांंचाही जंगी मेळावा पक्षाने घेऊन कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता. साधारण मे महिन्यात निवडणूक होईल, अशी सर्वांनाच आशा होती. मात्र राज्य शासनाने (State Government) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) प्रश्नावर आयोगाचे अधिकार स्वताकडे घेऊन निवडणुकाही पुढे ढकलल्या. त्यातच प्रशासकीय राजवट आता सुरु झाली.

पुन्हा निवडणुका कधी होतील हा प्रश्न आहे. केलेल्या तयारीवरही पाणी फेरले गेले आहे. दोन- चार महिन्यांंनी निवडणुका जाहीर झाल्या तरी त्यावेळेचे राजकीय वातावरण कसे असेल याची शाश्वती कोणाला देता येत नाही. आज विकासकामांंच्या बळावर व चार राज्यातील विजयानंंतर मतदारांमध्ये जे वातावरण आहे ते कायम राहील का? हा प्रश्न आहे.

आजही उमेदवार पहिली पसंती भारतीय जनता पक्षाला देत आहे. येथे उमेदवारी मिळाली नाही तर इतर पक्षांचा विचार करणार आहेत. मात्र या पुढील काळात प्रतिस्पर्ध्यांनी काही राजकीय खेळी खेळल्यास वातावरण बदलू शकते.

सध्या संधीसाधू राजकारण्यांचे पेव फुटले आहे. ते प्रत्येक पक्षाकडे जात आहे. जेथे संधी मिळेल तेथे ती साधण्याचा त्यांंचा डाव आहे. त्यामुऴे निष्ठावंंत प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. शेवटी निवडून येण्याचे मेरीट हेच असल्याने निष्ठा, प्रामाणिकपणा दुय्यम ठऱत आहे, ही खंतही कार्यकर्त्यांंना बोचत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या