Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशप्रियंका गांधी बचावल्या; ताफ्यातील चार गाड्यांची एकमेकांना धडक

प्रियंका गांधी बचावल्या; ताफ्यातील चार गाड्यांची एकमेकांना धडक

रामपूर:

उत्तर प्रदेशमधील रामपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला अपघात झाला.सुदैवाने या अपघातामध्ये प्रियंका थोडक्यात बचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

- Advertisement -

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या अंत्य संस्काराला जात असताना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या ताफ्याला अपघात झाला. एका पाठोपाठ अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्यात. सुदैवाने या अपघात प्रियांका गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. प्रियांका गांधी आपल्या ताफ्यासह आज सकाळी उत्तर प्रदेशातील रामपूरकडे रवाना झाल्या. प्रियांका यांच्या कारच्या वायपरमधील पाणी संपले होते, त्यातच कारची काच धुरकट झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या