Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआवक वाढताच भाजीपाला मातीमोल

आवक वाढताच भाजीपाला मातीमोल

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या महिन्यात विविध भागात कमी अधिक पाऊस झाल्यानंतर यामुळे भाजीपाला व इतर पिकांना जीवदान मिळाले आहे.

- Advertisement -

यादरम्यान झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने भावात काही प्रमाणात घसरण झाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येणार्‍या भाजीपाल्याची आवक वाढली असुन गुरुवारी (दि.30) समितीत 10 हजार क्विंटलच्यावर भाजीपाल्याची आवक झाली.

तसेच मुंबई उपनगरांकडे 70 व गुजरातकडे 20 भाजीपाल्याची वाहने रवाना झाली. दरम्यान ढोबळी मिरची, वांगी, टमाटे व हिरवी मिरचीला चांगला भाव मिळाला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईसह गुजरात व इतर राज्यात जाणारा भाजीपाला पुर्वपदावर आला आहे. अगोदर मुंबई उपनगर, गुजरात, इंदौर, पुणा, दिल्ली व इतर भागासाठी मार्केट कमेटीतून गुरुवारी रात्री 94

वाहनातून भाजीपाला रवाना झाला. गेल्या काही दिवसात ढोबळी व हिरवी मिरची, वांगी, टमाटे, काकडी, दोडका यांच्या भावात घसरण झाली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यापुर्वी नाशिक मार्केट कमेटीतील भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांना चांगला भाव मिळाला होता. नंतर जिल्ह्यात बहुतांशी भागात मागील काही दिवसात पाऊस पडल्याने आता भाजीपाल्याला जीवदान मिळाल्यानंतर भाजीपाला आवक वाढत आहे.

गुरुवारी मार्केट कमेटीत 10 हजार 435 क्विंटल भाजीपाल्यासं कांदा – बटाटा फळांची आवक झाली. नाशिकरोड येथील मार्केटच्या उपबाजारात देखील भाजीपाला चांगल्या प्रमाणात आला. यामुळे मुंबईकडे जाणार्‍या भाजीपाल्यात देखील वाढ झाली आहे.

गुरुवारी (दि.30) रोजी झालेल्या लिलाव प्रक्रियेत ढोबळी मिरचीला सर्वाधिक असा 3 हजार 750 रुपये (आवक 404 क्विंटल), हिरवी मिरची 3100 रु. (आवक 259 क्विंटल), गिलके 1670 रु.(एकुण आवक 49क्विंटल),

भोपळा 800 रु.(एकुण आवक 685 क्विंटल), टमाटा 1125 रु.(एकुण आवक 950 क्विंटल) असा भाव मिळाला. त्यांनंतर वांग्याला सरासरी 3500 रु. (एकुण आवक 355 क्विंटल) दोडका 3340 रु(एकुण आवक 60 क्विंटल), फ्लॉवर 1070 रु.(एकुण आवक 267 क्विंटल),

कोबी 840 रु.(एकुण आवक 288 क्विंटल), काकडी 1000 रु.(एकुण आवक 970 क्विंटल), भेंडी 1500 रु. (आवक 90 क्विंंटल) असा भाव मिळाला. तसेच कांद्याला आज प्रति क्विंंटल 625 रु., बटाटा 2350 रु. आणि लसुन 7500 रु. असा भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या