ढोबळी मिरचीला आठ हजारावर भाव

ढोबळी मिरचीला आठ हजारावर भाव

शेतकर्‍यांना दिलासा; भाजीपाल्याचे भाव वधारले

नाशिक । Nashik

जिल्ह्यात विविध भागात चांगला प्रमाणात पाऊस सुरू झाला असुन आता परतीच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान होऊ लागले आहे.

कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने याचा परिणाम शेतीमालाच्या उत्पन्नावर झाला आहे. परिणामी नाशिक मार्केट कमेटीत येणारा भाजीपाला कमी झाला आहे. याचा परिणाम भावावर झाला असुन सर्वच पालेभाज्या व भाजीपाल्याचे भाव वाढले आहे.

यात विशेषत: ढोबळी मिरची प्रति क्विटल भाव 8 हजारावर गेला असुन पिकेटोर, गवार व गिलके यांना सर्वाधिक भाव मिळत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक दिवसानंतर 12 हजाराच्यावर भाजीपाला, फळांची आवक झाली आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील बहुतांशी भागात चांगला पाऊस झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पाऊसाचे प्रमाण कमी झाल्याने भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती.

आता आक्टोंबर महिन्यात परतीच्या पावसाने अनेक भागात नुकसान केले असुन यात भाजीपाल्याचे नुकसान देखील झाले आहे. भाजीपाला खराब होऊ लागल्याने आवक कमी झाल्यामुळे ढोबळी मिरची, टॉमेटोसह भाजीपाल्या चांगला भाव मिळत आहे.

आता परतीचा पाऊस ठराविक भागात पडत असला तरी काही भागातत कोरडे वातावरण हे भाजीपाल्याला पोषक ठरत आहे. यामुळेच आता भाजीपाल्याची आवक कमी झाली असली तरी शेतकर्‍यांना भाव मात्र चांगला मिळू लागला आहे.

यात शनिवारी (दि.2) रोजी झालेल्या लिलाव प्रक्रियेत ढोबळी मिरची सर्वाधिक असा 8 हजार 125 रुपये (आवक 378 क्विंटल) असा भाव मिळाला असुन त्यानंतर गवारला 5 हजार (आवक 3 क्विंटलड इतका भाव मिळाला आहे. तसेच वांग्याला 4000 रु. (आवक 475 क्विंटल), दोडका5000 रु(एकुण आवक 288 क्विंटल), गिलके 4165 रु.(एकुण आवक 144 क्विंटल), भोपळा 2000 रु.(एकुण आवक 810 क्विंटल), टमाटा 2254 रु.(एकुण आवक 258 क्विंटल) असा भाव मिळाला.

तर फ्लॉवर 3750 रु.(एकुण आवक 231 क्विंटल), कोबी 2210 रु.(एकुण आवक 280 क्विंटल), काकडी 2500 रु.(एकुण आवक 1852 क्विंटल), भेंडी 2915 रु. (आवक 69 क्विंंटल) असा भाव मिळाला. तसेच समितीत 2 आक्टोंबर रोजी रोजी कांद्याला प्रति क्विंंटल 1100 रु., बटाटा 2300 रु. आणि लसुन 8600 रु. असा भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com