Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून वासंतिक नवरात्र, श्रीरामनवमी उत्सव

आजपासून वासंतिक नवरात्र, श्रीरामनवमी उत्सव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराचा (historical Shri Kalaram Temple of Nashik )वासंतिक नवरात्र उत्सव (Vasantik Navratra Festival )आज गुढीपाडव्यापासून ( Gudhipadva )सुरू होत आहे. 2 तेे 13 एप्रिलदरम्यान या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्याने होणार आहेत. दोन वर्षांच्या निंर्बंधानंंतर यंदा मोकळ्या वातावरणात रामनवमीचा उत्सव ( Ramnavami Festival ) साजरा होत असल्याने रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

यंदा काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष अतिरीक्त सत्र न्यायाधीाश आर. आर. राठी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. सायंकाळी साडेपाचला व्याखाने व रात्री आठला सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

शनिवारी (ता. 2) रात्री आठला दसककर भगीनींचे स्वरतीर्थ कार्यक्रम होईल.

रविवारी सायंकाळी साडेपाचला आरोग्य परिसंवाद होणार असून त्यात डॉ. समीर चंद्रात्रे, दीपाली निकम, शैलेश बोेंदार्डे, विनय वेलनकर, मनोज चोपडा, किशोर वाणी, शीतल मोगल, अरुण एकबोटे सहभागी होणार आहेत. रात्री आठला मुंबईच्या अक्षय आचरे व सहकारी रामराज्य नृत्य नाटिका सादर करणार आहेत.

सोमवारी (ता. 4) सुप्रसिध्द मलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा मुलखा वेगळी माणसें यावर व्याख्यान होईल व रात्री रसीका नातु सुरभ गौड यांचा भक्तीरंग कार्यक्रम होणार आहे.

मंगळवारी व बुधवारी ( ता. 5)सच्वीनांद शेवडे यांचे अपरिचीत रामायण यावर व्याख्यान व कथ्थक नृत्यांगणा सुमुखी अथनी, शिल्पा देशमुख व त्यांचे विद्यार्थी के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉमन्स आर्टस प्रस्त्तुत नृत्यधारा कार्यक्रम होईल.

बुधवारी (ता. 6) रात्री रागीणी कामतीकर व सहकार स्वराजीत कार्यक्रम सादर करतील.

गुुरुवारी ( ता. 4) अभिनेते शरद पोंंक्षे यांचे सावरकर विचार दर्शन होईल. व रात्री पुण्याचे चैतन्य कुलकर्णी राशी, सृष्टी पगारे हे अभंग रग सादर करणार आहे. शुक्रवारी रात्री सोहम ज्योती व शाम गोराणे हे भक्ती वंदना सादर करतील.

शनिवारी( ता. 9) डॉ. राज नगरकर हे योग व श्रीराम जीवन यावर व्याख्यान देणार आहे. रात्री गोरी गोसावी, ओकार कानेटकर, पल्लवी दीक्षित, स्वरा जोशी, श्रध्द्दा वैद्य आदी ंमुंबईचे कलाकर झी मराठी लिटील चॅम्प कार्यक्रम करतील.

सोमवारी (ता. 11) रात्री सुरेश पारीक व राम अवतार पारीक हे संगीतमय सुदरकांड सायंंकाळी पाचला सादर करणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसठी ाविश्वस्त धनंजय पुजारी, शांताराम अवसरे, एकनाथ कुलकर्णी, दिलीप कैचे, मंंगेश पुजारी, मंदार जानोरकर, दत्त्त्त प्रसाद निकम, शाम मंत्री, मिलिंंद तारे आदी प्रयत्नशील आहेत.

रामनवमीला दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी रामनामाचा जयघोष होईल. मंदिरात रोज पहाटे काकड आरती, नंंतर काळारामाला स्नान होईल.

राम मंदिरे सजली

पंचवटीतील गोरेराम मंदिर, रामकुंडावरील अहिल्यादेवी मंदिर, तपोवनातील श्रीराम पर्णकुटी, रविवार कारंजा परिसरातील तेली गल्लीतील राम मंदिर, मुठे गल्लीतील राम मंदिर, भोसला मिलिटरी कॉलेजच्या आवारातील राम मंदिर, नाशिकरोडला मुक्तिधाम, टाकळी मठ व परिसरातील बिर्ला मंदिर, तसेच वाल्मीकनगर येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या