Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यासाहित्य संमेलन : न्या. रानडे, वामनदादा कर्डक यांच्या स्मारकासह १३ ठराव मंजूर

साहित्य संमेलन : न्या. रानडे, वामनदादा कर्डक यांच्या स्मारकासह १३ ठराव मंजूर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ना त्या कारणाने पुढे पुढे गेलेले आहे. संमेलन जवळ आले तर पावसाचे आगमन झाले. तीन दिवसांपासून पावसाने सुट्टी घेतली आणि हे संमेलन निर्विघ्न पार पडले. संमेलनाचा एक भाग म्हणून ठराव घेतले जातात. न्या. महादेव गोविंद रानडे, यांच्या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक यांचेही स्मारक व्हावे असा यासह विविध ठराव घेण्यात आले…

- Advertisement -

हे आहेत ठराव

  • साहित्य कला संस्कृती समाजकारण, यात निधन झालेले व्यक्ती, करोनामध्ये निधन झालेल्या सर्वांसाठी श्रद्धांजली. बाबासाहेब पुरंदरे, विनायकदादा पाटील, चंद्रकांत महामिने, बनाबाई ठालेपाटील यांच्यासह अनेकांची नावे घेऊन श्रद्धांजली.

  • शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची गंभीर दुरवस्था झाली आहे. मोठे आजारपण, मुलांचे शिक्षण, केंद्र सरकारने बळीराजासाठी सर्वोतपरी मदत करावी.

  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे मराठीचा प्रस्ताव पाठवला आहे. मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा.

  • मराठी माध्यमांच्या शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र या शाळा बंद पडू नयेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शासनाने या शाळा बंद पडू नयेत यासाठी खुर्ची कार्यक्रम आखावा.

  • कर्नाटकमध्ये मराठीची गळचेपी होत आहे. तेथील संमेलनात मराठीचा विरोध होतो म्हणून निषेध.

  • ब्रह्म महाराष्ट्रासाठी स्वतंत्र मराठी विभाग निर्माण करावा अशी मागणी.

  • महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राची ओळख करण्यासाठी महाराष्ट्र परिचय केंद्र पुन्हा सुरु करावेत.

  • महाराष्ट्रात ६० पेक्षा अधिक बोली भाषा आहेत, बोली भाषांना प्रवाहात आणण्याचे प्रयत्न.

  • राजभाषा हिंदी मध्ये ‘ळ’ या शब्दासाठी प्रयत्न केलेल्यांचे आभार.

  • भारत सरकारने ‘ळ’ या वर्णाऐवजी इतर कोणतेही वर्ण वापरू नयेत.

  • सार्वजनिक ग्रंथालये टिकली पाहिजेत ग्रंथालयांना किमान अनुदान द्यावे ग्रंथालय संघाच्या मागणीला पाठींबा.

  • न्या. महादेव गोविंद रानडे, यांच्या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक यांचेही स्मारक व्हावे

  • महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याचे जतन करत बाबा भांड यांचे अभिनंदन.

- Advertisment -

ताज्या बातम्या