Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्या'वंदे भारत एक्स्प्रेस'ने मुंबई-शिर्डी प्रवास करताय? 'असे' आहेत तिकीट दर

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने मुंबई-शिर्डी प्रवास करताय? ‘असे’ आहेत तिकीट दर

मुंबई | Mumbai

नवे तंत्रज्ञान आणि अद्ययावत सुविधा असणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ (Vande Bharat Express) च्या माध्यमातून देशात एक नवी क्रांती पाहायला मिळत आहे. त्यातच आता मुंबई-शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे तिकीट दर जाहीर झाले आहेत.

- Advertisement -

बाळासाहेब थोरातांच्या राजीनामा प्रकरणावर डॉ. सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नाशिकमार्गे मुंबई-शिर्डी (Mumbai-Shirdi) आणि पुणेमार्गे मुंबई-सोलापूर (Mumbai-Solapur) जाणाऱ्या प्रवाशांसाठी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे हे तिकीट दर (Ticket Price) असणार आहे. त्यानुसार एक्झिक्युटीव्ह श्रेणी ११३५ ,मुंबई-सोलापूर प्रवासासाठी १९७० रुपये तर मुंबई-साईनगर, शिर्डी-नाशिकपर्यंतचे तिकीट ५५० रुपये व शिर्डीपर्यंत ८०० रुपये असून मुंबई-साईनगर शिर्डी एक्झिक्युटीव्ह श्रेणी नाशिकपर्यंत ११५० रुपये आणि शिर्डीपर्यंत १६३० रुपये इतका असेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

वातावरणात बदल : रात्री थंडी,दिवसा ऊन; चटका जाणवणार

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या तीन नव्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार असून यातून प्रवास करण्यासाठी चेअर कारमध्ये पुण्यापर्यंतच्या प्रवासासाठी ५६० रुपये तर सोलापूरपर्यंतच्या प्रवासासाठी ९६५ रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे.

दरम्यान, याशिवाय ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने मुंबई ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी ५ तास २० मिनिटे तर मुंबई ते सोलापूर अंतरासाठी ६ तास ३० मिनिटे इतका वेळ लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

“आम्ही पक्ष वाढविण्यासाठी…”; थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान

- Advertisment -

ताज्या बातम्या