Valentine Day : ...आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते! आजी-आजोबाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Valentine Day : ...आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते! आजी-आजोबाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

प्रेमाचे अनेक व्हिडीओ (Video) आजकाल आपल्याला सोशल मीडियावर (Social media) पाहिला मिळतात. कपल गोल (Couple goals) या टॅगलाईन (Tagline) खाली रोज अनेक कपल आपल्या प्रेमाच्या (Love) भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करतात.

प्रेम हे तरुणपणातच केलं पाहिजे असं काही नाही. वृद्ध काळातही प्रेम होऊ शकतं. प्रेम हे कधी कुठे कोणावर आणि कुठल्या वयात होतं याला काही मर्यादा नाही. सोशल मीडियावर आजोबा-आजीचे (grandma-grandpa) अनेक मजेदार व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहेत.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा कामगारांचा आहे. त्यामध्ये एक वृद्ध महिला आपल्या पतीला एक फूल देत प्रपोज करताना दिसत आहे. 'आय लव यू रामा' असं म्हणत ही महिला आपल्या पतीला प्रपोज करत आहे. त्यानंतर आजोबांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. जसं आजीने लव्ह यू म्हटलं आजोबाने तिला प्रेमाने मारलं. त्यांचा हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. bhillsamadhan346 या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या कुठला आहे याबद्दल काही समजलं नाही. पण खरंच प्रेम असावं तर असं...प्रेमाला ना वयाची आणि कुठल्याही गोष्टीची मर्यादा नसावी. ते फक्त फुलतं जावं. वृद्ध वयामध्ये एकमेकांवर भरपूर प्रेम करत जगण्याचा खऱ्याखुऱ्या आनंद कसा घ्यायचं हे कोणी या आजीआजोबांकडून शिकलं पाहिजे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com