Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात गाजलेल्या वैभव कटारे खून खटल्यातील फरार 23 वर्षांनी अटकेत

नाशकात गाजलेल्या वैभव कटारे खून खटल्यातील फरार 23 वर्षांनी अटकेत

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

तेवीस वर्षांपूर्वी देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील लॅम रोड (Lam Road) भागात झालेल्या वैभव कटारे खून खटल्यातील (Vaibhav Katare Murder Case) फरार बंदिवान रवींद्र पांडे (Ravindra Pande) यास नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 (Nashik Crime Branch Unit 2) च्या पथकाने गुजरात मधील कुवा गावातून अटक केली,….

- Advertisement -

देवळाली कॅम्प पोस्टे (Deolali Camp Police Station) गुन्हा रजिस्टर नंबर 103/2013 भादवि कलम 224 या गुन्ह्यातील फरार आरोपी रवींद्र मोगल पांडे (Ravindra Mogal Pande) हा अहमदाबाद (Ahmedabad) येथे असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव भोसले (APSI Shamrao Bhonsale) यांना मिळाली होती.

त्यानुसार, सपोनि श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव भोसले, पोलीस हवालदार शंकर काळे , पोलीस नाईक नंदकुमार नांदुर्डीकर, यांचे पथक अहमदाबाद करिता पाठवण्यात आले होते. हा आरोपी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी देवळाली काम पोस्टेचे ताब्यात देण्यात येत आहे.

हा आरोपी नाशिकरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 323 /1992 भादवि कलम 302 363 सह टाडा कायदा कलम 3 प्रमाणे, या गुन्ह्यात त्यास जन्मठेपेची शिक्षा लागलेली होती.

सुप्रीम कोर्टाने ही सदर शिक्षेवर शिक्कामोर्तब केलेले आहे. सदर आरोपी सन 1993 ते 1998 पावेतो शिक्षा भोगत होता.

18 फेब्रुवारी 1998 रोजी तो 14 दिवस संचित रजेवर सुटला होता. परंतु, त्यानंतर तो कारागृहात हजर झाला नाही. म्हणून देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

मागील 23 वर्षांपासून सदर चा आरोपी मिळून येत नव्हता. परंतु गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव भोसले यांना मिळालेल्या बातमीवरून,त्यास अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या