जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला

दिवसभरात 23 हजार जणांना डोस
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी पाच ते दहा हजार होणारे लसीकरण मंगळवारी अचानक वाढले असून जिल्हाभरात काल 205 केंद्रांवर दोन्ही मिळून 22,984 जणांना करोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 10 लाख 96 हजार 549 नागरीकांना लस देण्यात आली आहे.

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत होता. आतापर्यंत आठडाभरात सरासरी 13 ते 15 हजार लसी जिल्ह्यासाठी उपलब्ध होत होत्या तर दररोज सरासरी पाच ते दहा हजार जणांचेच लसीकरण होत होते.

पंरतु रविवारी जिल्ह्याला 45 हजार लसी उपलब्ध झाल्याने काल लसीकरणाचा वेग वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेली दीड महिनाभरापासून लसींचा तुटवडा असल्याने 250 पैकी निम्मे लसीकरण केंद्र बंद होते.

काल दिवसभरात नाशिक महापालिकेच्या 33 तर जिल्हाभरातील 167 व मालेगाव 5 अशा एकुण 205 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात 20 हजार 365 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 6 हजार 937 ग्रामिण जिल्ह्यात 9 हजार 885, मालेगाव 414 असे लसीकरण झाले आहे. तर 2 हजार 619 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com