आजपासून महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे लसीकरण

आजपासून महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे लसीकरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या corona तिसर्‍या लाटेचा धोका कमी झाल्याने सरकारने 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये colleges सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी पहिल्यात दिवशी लसीचे दोन्ही डोस घेतलेले नसलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे प्रमाण समोर आल्याने आज (दि. 25) पासून महाविद्यालयांमध्ये 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे तसेच प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लसीकरण vaccination of college students केले जाणार आहे.

यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी शुक्रवारी (दि.22) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत ही माहिती दिली होती.यावेळी करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका कमी झाल्याने महाविद्यालये सुरू झाली आहेत.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे शिक्षकांनी व पदाधिकार्‍यांनी लक्ष केंद्रित करावे विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले. करोना प्रतिबंधांमुळे गेल्या दीड वर्षांपासून महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानुसार आज पासून 18 ते 25 हा वयोगट लक्षात घेऊन 40 लाख विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com