Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक विभागात 'इतक्या' नागरिकांचे झाले लसीकरण

नाशिक विभागात ‘इतक्या’ नागरिकांचे झाले लसीकरण

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

करोना संसर्गाला (Corona) प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने (Government of Maharashtra) लसीकरणाची (Vaccination) मोहिम हाती घेतली आहे….

- Advertisement -

नाशिक विभागातील (Nashik Division) नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar), धुळे (dhule), जळगाव (Jalgaon) आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यासाठी एकूण ५० लाख ३२ हजार ३२० डोस प्राप्त झाले होते.

त्यापैकी एकूण 48 लाख 43 हजार 943 नागरिकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ (Dr. P. D. Gandal) यांनी दिली आहे…

नाशिक जिल्ह्यात १६ लाख ४२ हजार ४५२ नागरिकांचे लसीकरण

नाशिक जिल्ह्याला (Nashik District) एकूण १७ लाख ५४ हजार २० डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ हजार ४५२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर (Health Care Worker) म्हणून काम करणाऱ्या ६९ हजार ११३ कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून ४० हजार ९२० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

फ्रंट लाईन वर्कर (Front Line Worker) म्हणून काम करणाऱ्या १ लाख २७ हजार ६०६ कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून ५४ हजार ५३५ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील २ लाख ६९ हजार ८८१ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून ३१ हजार ९४८ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ च्या पुढील ७ लाख ६६ हजार ३०५ जणांना पहिला डोस देण्यात आला तर २ लाख ८२ हजार १४४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ११ लाख ८० हजार ५९ नागरिकांचे लसीकरण

अहमदनगर जिल्ह्याला (Ahmednagar District) एकूण १२ लाख ३९ हजार २५० डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण ११ लाख ८० हजार ५९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या ४४ हजार ८०६ जणांना पहिला डोस देण्यात आला असून ३३ हजार ४३० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या ५८ हजार ५५४ कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून २३ हजार ४०७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील १ लाख ७७ हजार ४५१ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून २७ हजार ९०१ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ च्या पुढील ५ लाख ७५ हजार ५५८ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून २ लाख ३८ हजार ९५२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात एकूण ६ लाख १७ हजार २०९ नागरिकांचे लसीकरण

धुळे जिल्ह्याला (Dhule district) एकूण ६ लाख २७ हजार ४० डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण ६ लाख १७ हजार २०९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या १६ हजार ९५० जणांना पहिला डोस देण्यात आला असून १० हजार ४८० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या ३१ हजार ७३१ कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून ११ हजार ११९ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील १ लाख ५९ हजार २५५ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून १८ हजार ३०३ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ च्या पुढील २ लाख ६८ हजार ७५१ जणांना पहिला डोस देण्यात आला असून १ लाख ६२० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात ९ लाख २१ हजार ९६१ नागरिकांचे लसीकरण

जळगाव जिल्ह्याला (Jalgaon district) एकूण ९ लाख २६ हजार ८६० डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण ९ लाख २१ हजार ९६१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या ३० हजार २१४ जणांना पहिला डोस देण्यात आला असून २० हजार २१८ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या ६३ हजार ५२३ कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून २५ हजार ३२० कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील १ लाख ६५ हजार ३१ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून १७ हजार ५१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ च्या पुढील ४ लाख ५० हजार ५२८ जणांना पहिला डोस देण्यात आला असून १ लाख ५० हजार ७६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात ४ लाख ८२ हजार २६२ जणांचे लसीकरण

नंदुरबार जिल्ह्याला (Nandurbar District) एकूण ४ लाख ८५ हजार १५० डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण ४ लाख ८२ हजार २६२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या १४ हजार ८९७ जणांना पहिला डोस देण्यात आला असून ९ हजार ५९२ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या ४७ हजार ६९१ कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून १३ हजार ६५७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील ९४ हजार ६९० नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून ७ हजार ७६२ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ च्या पुढील २ लाख ४२ हजार ६१५ जणांना पहिला डोस देण्यात आला असून ५१ हजार ३५८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या