लसीकरणाचा उत्साह! पहिल्याच दिवशी 'इतक्या' मुलामुलींनी घेतला डोस

लसीकरणाचा उत्साह! पहिल्याच दिवशी 'इतक्या' मुलामुलींनी घेतला डोस

नवी दिल्ली / मुंबई | वृत्तसंस्था | New Delhi / Mumbai

महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात (India) सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांमुलींच्या लसीकरणाचा (Vaccination) कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. करोना संसर्गापासून (Corona) बालकांचा बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) लसीकरण अभियानाची व्याप्ती वाढवली आहे...

मुलांनी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी उत्साहाने सहभाग नोंदवला. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देशभरातील 37 लाख 84 हजार 212 मुलांनी पहिला डोस घेतला. जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत मुलांच्या लसीकरणाची मोहीम सुरु झाली आहेत. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक मुलांनी नोंदणी केली आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम, दिल्ली, पश्चिम बंगाल, चंदीगढ, जम्मू-काश्मीर, केरळ सह इतर अनेक राज्यांमध्ये मुलांचे लसीकरण सुरूवात करण्यात आले आहे. 2007 किंवा त्याआधी जन्म झालेली मुले लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत.

कोविन पोर्टलवर (cowin app) नोंदणी केल्यासह थेट केंद्रावर जावून देखील मुले लस घेवू शकतील. सर्वांना कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीचा डोस देण्यात येणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचे अतिरिक्त डोस पाठवण्यात आले आहेत.

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, करोना लस मुलांना कोविड-19 ची लागण होण्यापासून रोखण्यास मदत करते. करोना लस गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणे, दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि मुलांमधील मृत्यूचा धोका कमी करते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, करोनाच्या उच्च जोखीम गटातील मुलांसाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजेच लठ्ठपणा, मधुमेह किंवा दम्याने ग्रस्त मुले, ज्यांना करोनापासून गंभीर आजारी पडण्याचा सर्वाधिक धोका असतो, त्यांच्यासाठीही आवश्यक आहे. करोनाची जास्त लागण झालेल्या भागात राहणार्‍या मुलांसाठीही लसीकरण आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com