जिल्ह्यात 8 लाख 22 हजार जणांचे लसीकरण

जिल्ह्यात 8 लाख 22 हजार जणांचे लसीकरण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्हाभरात करोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. काल दिवसभरात 8 हजार 914 जणांना दोन्ही डोस देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 8 लाख 21 हजार 759 जणांना लस देण्यात आली. दरम्यान, कोव्हॅक्सीन हे केवळ 45 वर्षांवरील दुसरा डोस बाकी असणार्‍यांना देण्यास सुरूवात झाल्याने ते इतरांना नाकारण्यात आले आहे.

शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत आहे. शहर तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 21 हजार 759 लसींचे दोन्ही मिळून डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसींचा अपुरा साठा असल्याने पुन्हा एकदा लसीकरणावर याचा परिणाम होत आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात दोन्ही मिळून 8 हजार 914 जणांना लस देण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र आठ दिवसांपासून लसींचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद होती. रविवारच्या पुरवठ्यानंतर कालच्या तुलनेत आज निम्मे केंद्र बंद होती. नाशिक महापालिकेच्या 5 तर जिल्हाभरातील 60 अशा एकुण 65 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात 4 हजार 275 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 849, ग्रामिण जिल्ह्यात 3 हजार 100, मालेगाव 123 असे लसीकरण झाले आहे. तर 4 हजार 639 जणांना दुसरा डोस देण्यात आला. 18 ते 44 वयोगटांतील 659 जणांना लस देण्यात आली .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com