आज पासून हेल्मेटसक्ती अधिक तीव्र

दुचाकीवर बसणार्‍यालाही हेल्मेट आवश्यक
आज पासून हेल्मेटसक्ती अधिक तीव्र

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आजपासून नाशिक शहरात आयुक्तालयाच्या हद्दीत (Within the limits of Commissionerate in Nashik city )हेल्मेट ( Helmet )सक्तीचा नियम अधिकच तीव्र करण्यात येणार असून शहरातील महत्त्वाचे चौक, सिग्नल, वाहतूक पॉईंटवर आता तपासणी सुरू होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सीताराम गायकवाड (Sitaram Gaikwad, Assistant Commissioner, Transport Branch ) यांनी परिपत्रकात दिली.

पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey )यांनी नाशिक शहरात दुचाकी अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशन, नो हेल्मेट, नो पेट्रोल, नो हेल्मेट, नो कॉपरेशन, त्यानंतर दंडात्मक कारवाई अशा मोहीम राबवल्या.

त्यांअतर्गत 9 सप्टेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 5 हजार 456 पुरुष व 476 महिला असे 5 हजार 932 विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे नाशिक फस्ट येथे समुपदेशन करण्यात आले. नाशिक शहरात 12 ठिकाणी समुपदेशन केंद्र उभारून आतापर्यंत 47 हजार 299 विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले.

तसेच 18 जानेवारी 2022 ते आतापर्यंत 14 हजार 116 विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर 75 लाख 83 हजार 500 रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. आता आज (दि.2) पासून पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकीस्वारांना चालकासह मागे बसणार्‍यालादेखील हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून दुचाकीस्वारांनी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी करावा व आपला वेळ व आर्थिक झळ सोसण्यापासून वाचावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे केले आहे.

सहा महिन्यांत विनाहेल्मेट 56 मृत्यू

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांत 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत दुचाकीस्वारांचे 59 अपघात झाले. त्या अपघातांत 54 पुरुष व 8 महिला असे 62 दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले. त्यामध्ये विनाहेल्मेट वाहन चालवल्यामुळे 48 पुरुष व 8 महिला असे 56 जण मृत्युमुखी पडले.

Related Stories

No stories found.