Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यारक्तविकाराच्या निदानासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. एच.पी.पती

रक्तविकाराच्या निदानासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. एच.पी.पती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रक्ताशी निगडीत विकाराचे (Blood disorders) योग्य वेळी निदान झाले, तर रुग्ण बरे होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे योग्य निदान व उपचार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन इंडियन सोसायटी ऑफ हिमॅटोलॉजी अ‍ॅण्ड ब्लड ट्रान्स्फूजनचे (Indian Society of Hematology and Blood Transfusion)अध्यक्ष डॉ.एच.पी.पती (Dr. H. P. Pati)यांनी केले. नाशिकमध्ये रक्तासंबंधित आजारांसाठी सेंटर सुरु करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

हॉटेल रेडिन्सन ब्ल्यू येथे इंडियन सोसायटी ऑफ हिमॅटोलॉजी अ‍ॅण्ड ब्लड ट्रान्स्फूजन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखा यांच्या वतीने आयोजित हिमॅटोलॉजी विषयावरील राष्ट्रीय परीषदेत ते बोलत होते. या दोन दिवसीय परीषदेच्या आज पहिल्या दिवशी आयएमए अध्यक्षा डॉ.राजश्री पाटील, सचिव डॉ.विशाल पवार, यांच्यासह डॉ.किरण शिंदे, हिमॅटोलॉजीस्ट सिद्धेश कलंत्री व अन्य तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

सत्राच्या माध्यमातून डॉ.पती यांनी बालकांसंबंधी रक्तस्त्रावाची कारणे व त्यासंबंधी उपचार याबाबत सहभागी डॉक्टरांना मार्गदर्शन केले. तसेच दिवसभरात विविध सत्र घेण्यात आले. डॉ.प्रितीश जुनागडे, डॉ.मनोज चोपडा, डॉ. नीलेश वासेकर, डॉ.पिंकी शहा, डॉ.अभय वालिया, डॉ.विनोद विजन यांनी सहभाग नोंदवतांना रक्तविकारांसंदर्भात माहिती दिली. तसेच प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.शैनाज कोदीयाजी यांनीही उपस्थितांना रक्ताचे विकार यासंबंधी मार्गदर्शन केले.

डॉ.मैत्रेय भट्टाचार्य यांनी वेगवेगळे रक्त घटक व त्यांचा योग्य वापर याबाबत माहिती देतांना शंकांचे निरसन केले. डॉ.विनय बोहरा यांनी रक्तघटक देतांना होणार्‍या रिअ‍ॅक्शन व त्यावरील उपचार याबाबत मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या सत्रांचे सूत्रसंचालन डॉ.शलाका बागूल, सुचेता गंधे, शीतल मोगल, डॉ.प्रेरणा शिंदे, डॉ.गीतांजली मोगल यांनी केले.डाँ. विशाल पवार यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या