Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकरा वापर निर्माल्य कलशाचा, प्रश्न सुटेल आरोग्याचा!

करा वापर निर्माल्य कलशाचा, प्रश्न सुटेल आरोग्याचा!

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

करा वापर निर्माल्य कलशाचा, प्रश्न सुटेल आपल्या आरोग्याचा या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या घरातील निर्माल्य जर महानगरपालिकेने ( NMC) ठिकठिकाणी ठेवलेल्या निर्माल्य निर्माल्य कलशामध्ये टाकल्यास आपल्या सर्वांचे आरोग्य नक्कीच नीट राहील. आपल्या गोदावरी नदीचे ( Godavari River ) पावित्र्य देखील नक्कीच टिकून राहण्यास मदत होईल.

- Advertisement -

आलेल्या पर्यटकांना स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक सुजाण नागरिकांनी निर्माण टाकण्याची काळजी घेतल्यास रस्त्यावर निर्माल्य दिसणार नाही. उलट रस्ता निर्मळ दिसेल व प्रत्येकाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. निर्माण कलश ठेवलेले असताना बाजूला निर्माण म्हणजे आपणच आपल्या आरोग्याला व विविध आजारांना आमंत्रण दिल्यासारखे होणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाला नागरिकांनी सहकार्य केल्यास नाशिककरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.

निर्माल्य कलशाच्या बाहेर टाकणार्‍या नागरिकांना सक्त ताकीद द्यावी किंवा त्यांचे वर दंडात्मक कारवाई करावी. महापालिकेने याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे असे देखील परिसरातील रहिवाशी नागरिकांनी व पर्यटकांनी बोलून दाखवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या