Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशबायडेन यांनी मोडला ओबामांचा मतांचा विक्रम

बायडेन यांनी मोडला ओबामांचा मतांचा विक्रम

वॉशिंग्टन:

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडल्या आणि त्यासाठी मतमोजणी देखील सुरू आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार बायडेन यांना २५३ तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्ट्रोरल व्होट मिळाले आहे. बायडन यांनी ओबामांचा मतांचा विक्रम मोडला आहे..

- Advertisement -

अमेरिकेतील सहा राज्यातील ७१ इलेक्ट्रोरल व्होटांची मतमोजणी बाकी आहे. आज संध्याकाळपर्यंत निकाल पुर्ण होणार आहे. बायडेन यांना 7 कोटी 10 लाख पॉपुलर मत मिळाले आहे. 2008 मध्ये ओबामा यांना 6 कोटी 94 लाख 98 हजार 516 मते मिळाली होती.

अमेरिकेत सुरू असलेल्या या मतमोजणीदरम्यान मोठा ट्वीस्ट आला आहे. जो बायडन यांची गाडी सुसाट निघाली आहे. अटीतटीच्या या लढतीमध्ये अखेरच्या टप्प्यात जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले असताना अंतिम निकाल काय येतो? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले आहे.

वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार बायडन यांना 50.5 तर डोनाल्ड ट्रम्प यांना 48 टक्के मते मिळाली आहे. न्यूयार्क टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार बायडेन यांना २५३ तर ट्रम्प यांना २१४ इलेक्ट्रोरल व्होट मिळाले आहे.

जो बायडन यांनी ट्वीट करून विश्वास ठेवा आम्ही जिंकू असे ट्वीट करत समर्थकांना आश्वस्त केले आहे. विजयाच्या अगदी जवळ आल्यानंतर बायडन यांनी ट्वीट करून आपल्या समर्थकांना आश्वासन दिले. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन आणि त्यांच्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. पेन्सिल्वेनियामधून 5 लाख मतं गायब झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

मतमोजणीत अनेक ठिकाणी गैर प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या