कोरोना काळातही आयआयटीच्या विद्यार्थ्यास दीड कोटींचे पॅकेज

कोरोना काळातही आयआयटीच्या विद्यार्थ्यास दीड कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली

कोरोनामुळे मंदीचे वातावरण आहे. कोरोनाचा फटका आयटीसह अनेक क्षेत्राला बसला आहे. मात्र यंदाच्या वर्षीही आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कोट्यावधींची पॅकेज मिळली आहे. आयआयटीमध्ये या वर्षीचा पहिला प्लेसमेंट हंगाम सुरू झाला आहे. आयआयटी मुंबईत पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात १८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मागील वर्षापेक्षाही जास्त पॅकेज यावर्षी मिळाली आहेत.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक असे २ लाख डॉलर्स म्हणजे जवळपास १.५ कोटी रूपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. कॅलिफोर्नियातील गेंट या आयटी कंपनीने दीड कोटींचे पॅकेज ऑफर केले आहे. भारतातील कंपन्यांमध्ये ग्रॅविटॉन ट्रेडिंग, क्वांटबॉक्स या कंपन्यांनी ८० लाख रूपयांपर्यंतचे पॅकेज देऊ केले आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या अॅमस्टरडॅम आणि सिडनी प्रोफाईलसाठी हे पॅकेज देऊ केले आहे.

ट्रेडिंगमध्ये असणाऱ्या ऑप्टीवर या कंपनीने एकुण सात मुलांची निवड केली आहे. तर काहींची निवड ही सॉफ्टव्हेअर आणि क्वांट रिसर्चसाठी करण्यात आली आहे. भारतातील कंपन्यांनी आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी मद्रास येथून काही मुलांना नोकरीसाठीची ऑफर देऊ केली आहे. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी ४६ लाख रूपयांपर्यंतचे पॅकेज ऑफर केले आहे. त्यापाठोपाठ वर्ल्डक्वांट ३९ कोटी तर मॉर्गन स्टॅनलीने ३७ लाख आणि ३५ लाख रूपयांचे पॅकेज उबरमार्फत देण्यात आले आहे. एकुण १८ कंपन्यांनी या प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील विद्यार्थी निवडीच्या प्रक्रियेत मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, क्वालकॉम, बोस्टन कंसल्टींग ग्रुप, एपल एण्ड बेन यासारख्या कंपन्या आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांच्या निवडीच्या प्रक्रियेसाठी पुढे आल्या होत्या.

मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, क्वालकॉम, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, अॅपल आदींचा समावेश होता. पहिल्या सत्रात ऑप्टिव्हर या कंपनीने आंतरराष्ट्रीय ऑफर देऊ केली आहे. तर, यंदा १५३ विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटपूर्व ऑफर्स स्वीकारल्या आहेत, असे संस्थेने स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्लेसमेंटवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र तरीही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

सर्वाधिक नोकऱ्या या आयटी, सॉफ्टवेअर, कोअर इंजिनीअरिंग आणि कन्सल्टिंग या क्षेत्रात मिळाल्याचे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे. क्वालकॉम या कंपनीने ४६.४१ लाखांचे, वर्ल्डक्वाण्ट कंपनीने ३९.७० लाख, मॉर्गन स्टेन्ली या कंपनीने ३७.२५ लाख, तर उबरने ३५.३८ लाख इतके वार्षिक पॅकेज देऊ केले आहेत. आयआयटी मद्रासमध्ये पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात १२३ विद्यार्थ्यांना ऑफर्स मिळाल्या आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, बजाज ऑटो, इस्रो या कंपन्यांचा समावेश होता. येथे मायक्रोसॉफ्टने सर्वाधिक १९, तर इस्रोने १० ऑफर्स दिल्या आहेत. आयआयटी मद्रासमध्ये यंदा सुमारे २५६ कंपन्यांनी नोंदणी केली असून यात ७१ स्टार्टअप्सचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com