आज पहिल्यांदाच नाशिक केंद्रांवर युपीएससी परीक्षा

आज पहिल्यांदाच नाशिक केंद्रांवर युपीएससी परीक्षा

प्रशासना मार्फत सर्व स्तरांवर काटेकोर नियोजन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक केंद्रावर प्रथमच संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) पूर्व परीक्षा आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेकरिता जिल्हाधिकारी सुरज मांढरे District Collector Suraj Mandhare, यांची समन्वयक पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर राज्य निरीक्षक म्हणून महानगरपालिका,आयुक्त कैलास जाधव NMC Commissioner Kailas Jadhav यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शहरातील दहा केंद्रांवर ही परीक्षा नाशिक घेण्यात येणार असून परीक्षेकरिता एकूण ३४४५ उमेदवार बसलेले आहेत. दहा दिव्यांग उमेदवारांसाठी स्वतंत्र परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.परीक्षेकरिता एकूण ४८० अधिकारी व कर्मचारी ,उपकेंद्र प्रमुख, स्थानिक पर्यवेक्षक, समवेक्षक व इतर मदतनीस म्हणून नेमण्यात आले आहेत.

सर्व केंद्रावर आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. परीक्षेच्या दिवशी जिल्हाधिकारी तसेच राज्य निरीक्षक म्हणून आयुक्त महानगरपालिका आणि संघ लोकसेवा आयोगद्वारे नियुक्त अधिकारी हे परीक्षेदरम्यान सर्व केंद्रांना भेटी देऊन परीक्षा सुरळीतपणे सुरू असल्याची खात्री करणार आहेत.

परीक्षा संघ लोकसेवा आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करून घेणेबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बैठका घेऊन तशा सूचित करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.