Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याUPSC चा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका

UPSC चा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका

नवी दिल्ली | New Delhi

युपीएससी परीक्षा (UPSC Exam 2022) २०२२ चा निकाल जाहीर झाला असून पहिल्या चार रँकवर मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये इशिता किशोर हीनं देशात पहिली रँक मिळवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया आणि तिसऱ्या क्रमांकावर उमा हरती एन, चौथा क्रमांक मयूर हजारिका आणि पाचवा रत्न नव्या जेम्सने मिळविला आहे…

- Advertisement -

युपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेत ९३३ उमेदवार पात्र ठरले असून पहिल्या चारही स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे. मुलाखतीला उपस्थित असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. निकालासोबतच टॉपर्सची यादीही जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे UPSC मुलाखत संपल्यानंतर अवघ्या ५ दिवसांनी निकाल जाहीर झाला आहे.

Accident News : पंढरपूरहून परणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ३ ठार, ७ जण गंभीर जखमी

पात्र ९३३ यशस्वी उमेदवारांपैकी ३४५ सामान्य श्रेणीतील, ९९ EWS, २६३ OBC, १५४ SC, ७२ ST प्रवर्गातील आहेत. या परीक्षेद्वारे IAS साठी १८०, IFS साठी ३८, IPS साठी २००, केंद्रीय सेवा गट ‘A’ साठी ४७३ आणि गट ‘B’ सेवांसाठी १३१ पदे भरण्यात आली आहेत.

UPSC CSE प्राथमिक परीक्षा ५ जून २०२२ रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल २२ जून रोजी जाहीर झाला होता. १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि ६ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला होता. त्यानुसार निवड कार्फण्यात आलेल्या उमेदवारांच्या १८ मे रोजी मुलाखती संपल्या होत्या. त्यांनतर अवघ्या काहीदिवसातच निकाल जाहीर करण्यात आला आहे.

“मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार आहे…”; Twitterवरून दिली धमकी, यंत्रणा अलर्ट मोडवर

ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली

यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचा दबदबा पाहायला मिळतोय. ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली आहे. वसंत दाभोळकरने ७६ वा क्रमांक, प्रतिक जराड १२२ वा क्रमांक, जान्हवी साठे १२७ वा क्रमांक, गौरव कायंदे-पाटील १४६ वा क्रमांक तर ऋषिकेश शिंदे १८३ वा क्रमांक, अमर राऊत २७७ वा क्रमांक, अभिषेक दुधाळ २७८ वा क्रमांक, श्रुतिषा पाताडे २८१ वा क्रमांक, स्वप्नील पवारने २८७ वा क्रमांक, अनिकेत हिरडेने ३४९ वा क्रमांक, संकेत गरुड ३७० वा क्रमांक, ओमकार गुंडगेने ३८० वा क्रमांक, परमानंद दराडे ३९३ वा क्रमांक, मंगेश खिलारीने ३९६ वा क्रमांक पटकावला आहे.

सागर खराडे ४४५ वा क्रमांक, करण मोरे ४४८ वा क्रमांक, पल्लवी सांगळे ४५२ वा क्रमांक, आशिष पाटील ४६३ वा क्रमांक, अभिजीत पाटील ४७० वा क्रमांक, शशिकांक नरवडे ४९३ वा क्रमांक, प्रतिभा मेश्राम ५२७ वा क्रमांक, शुभांगी केकाण ५३० वा क्रमांक, प्रशांत डगळे ५३५ वा क्रमांक, लोकेश पाटील ५५२ वा क्रमांक, प्रतीक्षा कदम ५६० वा क्रमांक, जितेंद्र कीर ५६९ वा क्रमांक, अक्षय नेर्ले ६३५ वा क्रमांक, मानसी साकोरे ५६३ वा क्रमांक, अमित उंदिरवादेने ५८१ वा क्रमांक, प्रतिक कोरडे ६३८, शिवम बुरघाटे ६५७ तर केतकी बोरकरने ६६६ वा क्रमांक पटकावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या