महापालिका निवडणुकीची चाहूल; प्रभागरचने बाबत शासनाचे 'हे' निर्देश

महापालिका निवडणुकीची चाहूल; प्रभागरचने बाबत शासनाचे 'हे' निर्देश
USER

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मुदत संपलेल्या व भविष्यात ज्या महापालिकांची ( Municipal Corportions )मुदत संपत आहे त्यांची प्रभाग रचना ( Ward Structre )तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे लवकरच निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तयार केलेली तीनची जुनी प्रभागरचना कायम ठेवायची की नव्याने फेररचना करायची याबाबत संभ्रम आणखी वाढला आहे.

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर,नाशिकसह १७ महानगरपालिकांची मुदत संपुष्टात आली असून मागील एक वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना तीनची प्रभागरचना पूर्ण झाली होती. तसेच लोकसंख्येनूसार सदस्य संख्याही वाढविण्यात आली होती. मात्र, राज्यात संत्तातर होताच शिंदे व फडणवीस सरकारने तीनची प्रभागरचना निर्णय रद्द केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com