आगामी महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने?

आगामी महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आगामी नाशिक महापालिका निवडणूक ( Upcoming NMC Election )3 सदस्यी प्रभाग रचनेनुसार ( Ward Structure )होणार असल्याचे आता जवळपास निश्चित होत आहे. कारण शासनाने यापूर्वी दिलेल्या निर्देशात फक्त वाढीव नगरसेवक ( Corporators )संख्या कमी करण्याचे आदेश दिले होते, मात्र प्रभाग रचना तीन की चार याबाबत कोणते ही नवीन आदेश दिले नसल्यामुळे 30 सप्टेंबर 2022 च्या आदेशानुसार 3 सदस्य प्रमाणे नवीन रचना होणार असल्याचे समजते. दरम्यान मागील प्रभागा रचनेच्या तुलनेत यंदा प्रत्येक प्रभागात लोकसंख्या तसेच मतदार संख्या देखील वाढणार आहे. तर नगरसेवक संख्या 133 वरून कमी होऊन 122 राहणार असल्याचे समजते.

दरम्यान आज दुपारी निवडणूक आयोगाबरोबर ( State Election Commission )झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठकीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भाग घेतला होता. यावेळी आयोगाने मतदान यादीचा घोळ होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचना केल्या. त्याचप्रमाणे मागच्या वेळेला झालेल्या त्रुटी दूर करून अद्यावत मतदार यादी तयार करण्याचे आदेश देखील दिले आहे. यासाठी महापालिका प्रशासन तसेच महसूल विभागाचे अधिकारी प्रयत्न करणार आहे.

मागच्या वेळेला प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यावर 3800 च्यावर हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आता अशी परिस्थिती येऊ देऊ नये असे नमूद करण्यात आले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना नाशिक महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने एकूण 12 लाख 372 मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यात 6 लाख 29 हजार 682 पुरुष तर 5 लाख 70 हजार 636 महिला मतदार संख्या होती. तर इतर 54 मतदार होते.

प्रभागांमध्ये मतदार संख्या तसेच लोकसंख्या वाढणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार नाशिक शहरातील लोकसंख्या सुमारे 14 लाख 85 हजार आहे तर यापूर्वी महापालिकेने महाविकास आघाडी सरकारच्या काळात 133 नगरसेवक याप्रमाणे मतदार यादी तयार केली होती, मात्र अकरा जागा कमी होणार असल्यामुळे 122 जागांवर निवडणूक होणार असल्याने प्रत्येक प्रभागात मतदार संख्या व लोकसंख्या आता वाढणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com