Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशNew IT Rules: ट्विटर का झाला गुन्हा दाखल?

New IT Rules: ट्विटर का झाला गुन्हा दाखल?

नवी दिल्ली

नवीन आयटी नियमांचे पालन न करणे ट्विटरला चांगेलच महागात पडले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटर (Twitter) इंडिया आणि २ काँग्रेस नेत्यासह ९ जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केली आहे. पोलिसांनी मोहम्मद जुबैर, राना अय्यूब, द वायर, सलमान निजामी, मसकूर उस्मानी, समा मोहम्मद, सबा नकवी, ट्विटर कम्यूनिकेशन इंडिया प्रायवेट लिमिटेड विरोधात गुन्हा दाखल केली आहे.

- Advertisement -

आजपासून हॉलमार्किंग सक्तीचे, मग घरातील सोन्याचे काय होणार?

नवीन आयटी नियमांचे पालन न केल्यामुळे ट्विटरने कायदेशीर संरक्षणाचा अधिकार गमावला आहे. सरकारकडून २५ मे पासून लागू नवीन आयटी नियमांना ट्विटरने अद्याप लागू केले नाही. मुख्य अनुपालन अधिकारी (CCO)नियुक्त केला नाही. यामुळेच ट्विटरवर ही कारवाई झाली आहे. म्हणजेच, ट्विटरवर आता आयपीसी (IPC) अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकणार आहेत. FIR मध्ये घटनेला जातीय रंग दिल्याचा आरोप आहे. तसेच, पोलिसांकडून प्रकरण स्पष्ट केल्यानंतरही ट्विटरने चुकीचे ट्विट हटवण्यास कोणतीही पाऊले उचलली नाहीत.

केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आतापर्यंत कलम ७९ अंतर्गत सुरक्षा पुरवली जायची. ही सुरक्षा ट्विटरलाही मिळत होती. यात कोणत्याही गुन्ह्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केल्यावर त्याची जबाबदारी कंपनीची नव्हती. नवीन आयटी नियमांतर्गत सरकारने म्हटले की, सोशल मीडिया कंपनीने एका महीन्याच्या आत मुख्य अनुपालन अधिकारी (CCO) ची नियुक्ती करावी, जो यूजर्सच्या तक्रारी सोडवेल. नियुक्ती न केल्यास सरकारने कलम ७९ अंतर्गत सुरक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता. यानंतर ट्विटरविरोधात पहिली FIR दाखल झाली.

काय आहे FIR मध्ये

टि्वटरवर दाखल FIR मध्ये म्हटले की, गुन्हा दाखल झालेल्या सर्व लोकांनी ट्विटरवर सत्य जाणून घेतल्याशिवाय घटनेला जातीय रंग दिला. त्यांनी समाजात अशांती पसरवणे आणि जातीय दंगे भडकवण्यासाठी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करण्यात आला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, घटना वयक्तिक वादातून झाली. यात हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोक सामील होते. पण, आरोपींनी घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. भादवि १५३, १५३ (अ), २९५ (अ), ५०५, १२० (ब) आणि ३४ या कलमातंर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण ?

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात काही लोक एका मुस्लिम वृद्धाला मारहाण करताना दिसत आहेत. त्या वृद्धाने जय श्री राम न म्हटल्यामुळे मारहाण करत दाढी कापल्याचा आरोप केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या