Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याUP Results 2022 : उत्तरप्रदेशात भाजपा सुसाट; अखिलेश यादव म्हणतात, इम्तिहान बाकी...

UP Results 2022 : उत्तरप्रदेशात भाजपा सुसाट; अखिलेश यादव म्हणतात, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का…

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी (Results result) सुरु आहे. लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या यूपीच्या (up election) या निवडणुकीमध्ये ४०३ जागांसाठी मतदान झालं असून एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, २५२ जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप १६९ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ७८ जागा, बसप, ०३, अन्य ०२ वर आहेत. काँग्रेस पक्षाला अजूनही खाते उघडता आले नाही.

या निकालादरम्यान समाजवादी पक्षाचे (SP) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट केलं आहे. अखिलेश यादव यांचं हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. ईव्हीएमवर लक्ष ठेवल्याबद्दल त्यांनी सपा कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. मतमोजणी केंद्रांवर लक्ष ठेवण्याचे आदेश अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. तसेच, सपा नेत्यांसाठी आठ ते आठ तासांच्या तीन शिफ्ट लावण्यात आल्या होत्या.

अखिलेश यादव यांनी ट्वीट केले की, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का’ मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुक आणि सतर्कतेनं कार्यरत राहिल्याबद्दल सपा-आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे, समर्थकांचे, नेते, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! ‘लोकशाहीचे पाईक’ विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परततील!

- Advertisment -

ताज्या बातम्या