Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादै. देशदूत-मविप्र आयोजित 'माती वाचवा' कार्यक्रमाचे नोंदणी संकेतस्थळ अनावरण

दै. देशदूत-मविप्र आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रमाचे नोंदणी संकेतस्थळ अनावरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘माती वाचवा’ या मोहिमेंतर्गत ( Save Soil Campaign ) श्री सद्गुरू ( Shri Sadguru ) अर्थात जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) 11 जून रोजी नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन दैनिक ‘देशदूत’ आणि मराठा विद्या प्रसारक समाज ( Daily ‘Deshdoot’ and Maratha Vidya Prasarak Samaj) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

- Advertisement -

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या या कार्यक्रमाचे नोंदणी संकेतस्थळ अनावरण (Event registration website unveiled) देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाबाबत माहिती देताना डॉ.बालाजीवाले यांनी सांगितले, मातीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ईशा फांउडेशनचे ( Isha foundation ) संस्थापक सद्गुरु अर्थात जग्गी वासुदेव यांनी संपूर्ण जगात ‘माती वाचवा’ची (Save Soil ) ची मोहीम हाती घेतली आहे. यात सद्गुरू यांची जागतिक यात्रा सुरु आहे. या यात्रेअंतर्गत सद्गुरू येत्या 11 जूनला नाशिकमध्ये येत असून नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. शहरातल्या केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी 4:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रायोजक दीपक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सह प्रायोजक चंदू काका सराफ आणि सन्स प्रा. लि. तसेच अ‍ॅग्री सर्च प्रा.लि., आणि रेडीओ पार्टनर रेडीओ विश्वास आहे.

अशी करा नोंदणी

कार्यक्रमाची नोंदणी करण्यासाठी http://savesoil.deshdoot.live/ या संकेतस्थळाला भेट द्या. किंवा सोबत दिलेला क़्यु आर कोड आपल्या फोनमध्ये स्कॅन करा आणि महत्वाची माहिती भरून आपली जागा पक्की करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या