जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; पंचनामे सुरू

साडेसहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; पंचनामे सुरू

मुंबई । वृत्तसंस्था

राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासूनअवकाळी पावसानें हजेरी लावली आहे. अशातच आता अनेक भागात गारपीट झाल्याचेंही समोर येत असल्यानें शेतकरी हताश झाले आहेत.नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये शेतीचें मोठें नुकसान झालें आहे.

याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तलाठी तसेंच कृषी अधिकार्‍यांकडून पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक तपासणीदरम्यान साडेसहा हजार हेक्टरवरील पिकांचें नुकसान झाल्याचें समोर आलें आहे. या पावसाचा कापणीला आलेल्या द्राक्षबागांना फटका बसला आहे. येत्या गुरुवारपर्यत या सर्वाचे पंचनामे पूर्ण करण्यात येतील.

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 6 हजार 89 हेक्टरवरील पिकांचें नुकसान झालें आहे.सटाण्यात 2 हजार 733 हेक्टरवरील पिकं आडवी झाली आहेत. तर निफाड , बागलाण ,कळवण,सिन्नर, दिंडोरीमध्येदेखील पिकांचेंमोठें नुकसान झालें आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केलीआहे.

सांगलीच्या तासगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानें झोडपून काढलं. यावेळी वादळी वार्‍यात तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी येथील तीन, सावळज येथील दोन आणि मणेराजुरी येथील एक अशा सहा द्राक्षबागा कोसळून भुईसपाट झाल्या. यामुळे शेतकर्‍यांचे सुमारे 52 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने द्राक्षबागांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.द्राक्षबागांच्या बरोबरच गहू, शाळू, हरभरा, मका तसेच पालेभाज्या यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

अवकाळी पाऊस सुरु असताना सुटलेल्या वादळी वार्‍यामुळे बागेतील स्टेजिंगचा तोल बिघडला आहे. द्राक्षांचे वजन पेलू न शकल्याने तारा तुटून बागाकोसळल्याचं चित्र आहे. नागपूर जिल्ह्यातही गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे कुही व नरखेड तालुक्याला फटका बसला आहे. विशेषत: काही तालुक्यात मिरचीच्या व गव्हाच्या शेतीचे काही भागात नुकसान झाले आहे

तालुकानिहाय नुकसान

मालेगाव -755 हेक्टर, सटाणा -2733 हेक्टर चांदवड-355 हेक्टर येवला-121 हेक्टर निफाड - 992 हेक्टर कळवण- 45 हेक्टर दिंडोरी - 793 हेक्टर नाशिक -70 हेक्टर त्र्यंबकेश्वर -72 हेक्टर सिन्नर -151 हेक्टर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com