नाशकात अवकाळी पावसाची हजेरी
पाऊस

नाशकात अवकाळी पावसाची हजेरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाला (Unseasonal Rain) सुरुवात झाली आहे. पावसाच्या (Rain) सरी कोसळू लागल्या आहेत. यामुळे बळीराजा (Farmer) चिंताग्रस्त झाला आहे...

आज सकाळपासूनच वातावरणात बदल झाल्याचे जाणवत आहे. दिवसभर थंड वातावरण होते, आणि सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली.

दरम्यान, महाराष्ट्रात (maharashtra weather upadte) पुन्हा गारपिटीसह जोरदार वारे (Heavy winds), विजांसह वादळी (thunderstorms) पावसाची (rain alert) शक्यता हवामान विभागाने (imd) वर्तवली आहे.

आज मराठवाड्यात (marathawada) जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. तर उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), उत्तर कोकणातही (North kokan) तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बळीराजा चिंताक्रांत

सर्वाधिक भांडवल खर्च लागणारी द्राक्षशेती आजच्या पावसाच्या रिपरिपमुळे संकटात सापडली आहे. एकीकडे करोनामुळे आधीच चिंतेत असलेले शेतकरी आजच्या बदलेल्या वातावरणाने आणि सायंकाळी आलेल्या पावसाच्या सरीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती व्यक्त करत आहेत. दोन वर्षांपासून तोट्यात आलेली द्राक्षशेत यंदा कर्जाचा भार हलका करेल असे वाटत होते, मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि करोना संकट यामुळे दुहेरी संकटात पुन्हा एकदा बळीराजा भरडला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com