Video : नाशकात अवकाळी पावसाची हजेरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ऋतुमानाप्रमाणे हिवाळा सुरु असला तरी नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि शहरातील काही भागात रिमझिम पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र आहे...

नाशिकरोड, महात्मा गांधी रोड, नवीन नाशिक, पंचवटीसह अन्य काही भागात पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांपासून वातारणात उष्णता जाणवत होती. रिमझिम पावसामुळे वातावरण थंड झाले.

दरम्यान, ढगाळ व पावसाच्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये (Grape Growers) धडकी भरली आहे. प्रत्येक वर्षी अशा वातावरणमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झालेले आहे.

या वातावरणाचा उशिरा छाटणी झालेल्या द्राक्षबागा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून अशा ढगाळ व रिमझिम पावसामुळे घडकुज, मणीगळ तसेच डावणी व भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असतो. तर अनेक द्राक्ष बागा या रिमझिम पावसामुळे रोगग्रस्त होत असतात.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com