निळवंडी मारहाण प्रकरणाचा उलगडा; पुतण्यानेच दिली ठार मारण्याची सुपारी

निळवंडी मारहाण प्रकरणाचा उलगडा; पुतण्यानेच दिली ठार मारण्याची सुपारी

दिंडोरी । प्रतिनिधी | Nashik

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) निळवंडी (Nilvandi) येथील पोलिस पाटील अंबादास पाटील यांना बेदम मारहाण (beating) झाली होती. कोणताही सुगावा नसतांना दिंडोरी पोलिसांनी (Dindori Police) उत्कृष्ट कामगिरी करत आरोपींना गजाआड केले असुन

निळवंडीचे पोलीस पाटील अंबादास पाटील यांचे सोबत असणारे शेतजमीन वाटप व कौटुंबिक वादाला कंटाळुन पोलीस पाटलाचा काटा काढण्यासाठी पुतण्यानेच ठार मारण्याची सुपारी दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात पुतण्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी नाशिक ग्रामीण जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी केदार कांगणे, कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड,

दिंडोरी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाने दिंडोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लहारे, पोलिस हवालदार नवले, पो.ना. कडाळे, पो.ना. पानसरे, बाळासाहेब कावळे, अमोल साळवे, हेमंत पवार, मधुकर बेंडकूळे, अविनाश आहेर यांचे तपास पथकाने सदर गुन्हा उघडकिस आणुन कामगिरी केली आहे.

असा घडला गुन्हा

18 ऑगस्ट 2022 रोजी दिंडोरी पोलिस ठाणे (Dindori Police Station) हददीतील निळवंडी शिवारात निळवंडी गावचे पोलिस पाटील अंबादास पाटील, रा. निळवंडी शिवार, निळवंडी ता. दिंडोरी जि.नाशिक हे निळवंडी शिवारात कुरणात गायी चारत असतांना अचानकपणे तीन अनोळखी व्यक्ती आले. त्यात एकाच्या हातामध्ये लाकडी भरीव दांडा होता. त्यावेळी काहीएक न बोलता त्यापैकी दोघांनी सदर पोलीस पाटील यांना पकडुन धरले व एकाने सोबत आणलेल्या लाकडी भरीव दांडयाने जबर मारहाण (beating) केली.

पोलीस पाटील हे खाली कोसळुन पडल्यावर त्यांनी त्यांचे कडील लाकडी दांडा तेथेच टाकुन तेथुन निघुन गेले. बाबत त्यांचा मुलगा संदिप अंबादास पाटील रा. निळवंडी ता. दिंडोरी यांनी फिर्याद (complaint) दिल्याने दिंडोरी पोलीस ठाणे । गु.र.नं. 274 / 2022 भा.द.वि. कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला वैद्यकिय प्रमाणपत्रात जखमीस गंभीर स्वरूपाची दुखापत झाले बाबत अभिप्राय नमुद असल्याने सदर गुन्हयात वाढीव कलम भा.द.वि. कलम 326 लावण्यात आले होते. त्यानंतर सदर गुन्हयाचा पुढील तपास हा सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्याकडेस वर्ग करण्यात आला होता.

असा रचला होता कट

सागर धुळे हा निळवंडी गावातील पोलिस पाटील यांचा रोशन पाटील याचे शेतामध्ये मजुरीसाठी आलेला होता. त्यावेळी रोशन पाटील याने अंबादास पाटील यांचे सोबत असणारे शेतजमीन वाटप व कौटुंबिक वादाला कंटाळुन पोलीस पाटलाचा काटा काढण्यासाठी आणि जमले तर त्याला जिवे ठार मारण्यासाठी तुझ्याकडे कोणी गुंड प्रवृत्तीचे माणसे आहेत का ? हे काम केले तर मी तुम्हाला 70,000/- रूपये असे सागर धुळेला बोलला होता.

त्यानंतर सागर धुळे याने सदरची गोष्ट त्याचे मित्रांना सांगुन सर्वानी कटकारस्थान रचुन नियोजन पूर्वक अंबादास पाटील यांच्यावर जिवे ठार मारण्यासाठी प्राणघातक हल्ला केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. फिर्यादी व साक्षीदार यांनी तसे जबाब दिल्याने सदर गुन्हयामध्ये भा.द.वि कलम 307, 120 (ब), 108 प्रमाणे कलम वाढ संदिप केंग, सागर धुळे, भावेश भवर, रोशन पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

असा लावला छडा

गुन्हयाचा तांत्रीक तपास करून गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशिर माहीतीच्या आधारे गोरक्षनाथ मुधकर शेखरे (31) रा. कादवानगर दिंडोरी, ता. दिंडोरी, अविनाश राजेंद्र ढिकले (22) रा. भगवा चौक दिंडोरी, ता. दिंडोरी, सागर शंकर भवर (20), सरकारी दवाखाना मागे दिंडोरी ता. दिंडोरी यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संदिप केंग रा. कृष्णगाव ता. दिंडोरी, भावेश भवर रा. कृष्णगाव ता. दिंडोरी, समाधान उर्फ सागर धुळे रा. वागळुद ता. दिंडोरी यांची नावे समोर आल्याने त्यांना वणी पोलीस ठाण्याचे मदतीने तपासकामी ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली गुन्ह्याची उकल झाली.

पोलिस अधिक्षकांकडून बक्षीस जाहीर

सदर कामाचे कौतुक म्हणुन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकाला दहा हजार रूपयाचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com