बंद
बंद
मुख्य बातम्या

Unlock 3; काय सुरु काय बंद राहणार

शाळा, महाविद्यालये बंदच राहणार

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली। New Delhi

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री फिरणावरील निर्बंध उठवण्यात आले आहे. तसेच ५ ऑगस्टपासून जीम देखील सुरु हाेणार आहे. परंतु मेट्राे, रेल्वे व चित्रपटगृह बंदच राहणार आहे. शाळा, महाविद्यालये व काेचिंग ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com