रेशन दुकानातून मिळणार ‘अनलिमिटेड इंटरनेट डेटा’

रेशन दुकानातून मिळणार ‘अनलिमिटेड इंटरनेट डेटा’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ग्रामीण भागात इंटरनेटचे ( Internet) जाळे विस्तारण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, आता रेशन दुकानातून ( Ration Shops ) स्वस्त धान्यासोबतच नागरिकांना इंटरनेट डेटाही उपलब्ध करुन दिला जाणार आहे, तेही अगदी अनलिमिटेड. त्यासाठी मोदी सरकारने 'पीएम वाणी योजना' (पंतप्रधान वायफाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस-Prime Minister WiFi access network interface) सुरू केली आहे.

केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातही रेशन दुकानाच्या माध्यमातून ‘वायफाय’ व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या योजनेद्वारे सार्वजनिक ठिकाणी वायफायची सुविधा दिली जाईल. त्यासाठी देशभर सार्वजनिक डेटा कार्यालये उभारली जाणार आहे.

रेशन दुकानांंतही ही डेटा कार्यालये असतील. तेथूनच परिसरातील नागरिकांना वायफायद्वारे इंटरनेटची सुविधा मिळेल. रेशन दुकानांचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने त्या माध्यमातून अगदी दुर्गम भागातही इंटरनेट पोहोचवता येणार आहे.सार्वजनिक डेटा कार्यालय एग्रिग्रेटर (पीडीओए) : सार्वजनिक डेटा कार्यालयांना एकत्रित आणेल. अधिकृत व लेखांकनाशी संबंधित कार्य करील.

प्रोव्हायडर

युजर्सची नोंदणी, तसेच परिसरात वानी अनुरूप हॉटस्पॉट शोधण्यासाठी ॲ विकसित करील आणि इंटरनेट सेवेमध्ये प्रवेश करण्यासाठी ॲतशी सुविधा उपलब्ध करून देईल.

केंद्रीय नोंदणी

सार्वजनिक डेटा कार्यालय, सार्वजनिक डेटा कार्यालय एग्रिग्रेटर ॲ प्रदाता यांचे तपशील ठेवतील. सुरुवातीला केंद्रीय नोंदणी सी-डॉटद्वारे ठेवली जाईल.

रेशन दुकान परिसरातील जवळपास 200 मीटर परिसरातील नागरिक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. सध्या या सेवेसाठी निश्चित दर ठरलेले नसले, तरी 100 रुपयांत अनलिमिटेड 4G इंटरनेट सेवा मिळेल. अगदी एक दिवसांसाठीही ही सेवा घेता येईल. त्यासाठी ग्राहकांना पाच रुपये मोजावे लागतील. त्यात 70 टक्के दुकानदार, तर 30 टक्के कमाई कंपनीला मिळणार असल्याचे सांगण्यात आले. पुरवठा उपाआयुक्त प्रज्ञा बडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर . पुरवठा तहसिलदार सोनवने, गणपत डोळसे पाटील .जिल्हा अध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे . ढवळू फसाळे . योगेश बत्ताशे . माधव गायधनी . फारूख शेख व पदाधिकारी व पी.एम.वाणी कंपनीचे पदाधिकारी यांच्यात प्राथमिक चर्चा उपायुक्त कार्यलयात झाली .

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com